Vijay Deverakonda Net Worth : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेत्यांचा बॉलिवूडमध्येही (Bollywood) चांगलाच बोलबाला आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीच नव्हे तर संपूर्ण देशभर त्यांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह' या चित्रपटामुळे 2019 मध्ये विजयला चांगलीच ओळख मिळाली. 'कबीर सिंह' हा चित्रपट विजय देवरकोंडाच्या 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाने 2017 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. विजय देवरकोंडा फक्त चित्रपटामुळेच चर्चेत राहत नाही तर आपल्या आलिशान आयुष्यामुळे चर्चेत असतो. 


विजय देवरकोंडाचा जन्म 9 मे 1989 रोजी हैदराबातमध्ये झाला आहे. गोवर्धन राव आणि माधवी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. विजय देवरकोंडा याचं खरं नाव विजय साई असं आहे. एका तेलुगू कुटुंबात त्याचा जन्म झाला आहे. विजय देवरकोंडाचे वडील गोवर्धन राव तेलुगू टेलिव्हिजनचे लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. विजय देवरकोंडाचं 12 वीपर्यंतचं शिक्षण हैदराबादमध्ये झालं आहे. पुढे कॉमर्समध्ये त्याने शिक्षण घेतलं. विजय देवरकोंडाचा लहान भाऊ आनंद देवरकोंडादेखील तेलुगू अभिनेता आहे. 


विजय देवरकोंडाच्या चित्रपटांबद्दल जाणून घ्या... (Vijay Deverakonda Movies) 


विजय देवरकोंडाने 2011 मध्ये 'Nuvvila' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर 2012 मध्ये तो 'लाइफ इज ब्यूटीफुल' या चित्रपटात झळकला. विजयने अनेक चित्रपट केले. पण 2017 मध्ये त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. संदीप रेड्डी दिग्दर्शित 2017 मध्य आलेल्या 'अर्जुन रेड्डी' चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता. विजयच्या करिअरमधला हा यशस्वी चित्रपट ठरला. विजयचा 2022 मध्ये 'लायगर' हा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा चित्रपट कमी पडला. 


विजय देवरकोंडा कोणाला करतोय डेट? 


'गीता गोविंदम' या 2018 मध्ये आलेल्या आणि 'डियर कॉमरेड' या 2019 मध्ये आलेल्या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या सेटवरचं विजय आणि रश्मिका एकमेकांच्या प्रेमात पडले. या चित्रपटातील विजय आणि रश्मिकाची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


विजय देवरकोंडाची नेटवर्थ किती? (Vijay Deverakonda Net Worth)


विजय देवरकोंडा एका चित्रपटासाठी 8 ते 10 कोटी रुपयांचं मानधन घेतो. तर एका जाहिरातीसाठी तो 1 ते 2 कोटी रुपये आकारतो. जाहिराती, चित्रपट, सोशल मीडिया अशा अनेक गोष्टींमधून विजय देवरकोंडा चांगलीच कमाई करतो. विजयच्या घराची किंमत 15 ते 17 कोटी रुपये आहे. तसेच त्याच्याकडे एकापेक्षाएक कार आहेत. विजय देवरकोंडाची एकूण संपत्ती 70 ते 75 कोटी रुपयांच्या आसपास आहे.