Govinda Krishna Controversy : बॉलिवूडचा 'हिरो नं.1' अशी ओळख असणारा अभिनेता गोविंदा ( Govinda) आणि त्याचा भाचा अभिनेता कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) यांच्यात मागील काही वर्षांपासून अबोला आहे. मात्र, गोविंदा आणि त्याचा मुलगा यशवर्धन यांनी नुकत्याच कृष्णाची बहीण आरतीच्या लग्नाला हजेरी लावली होती. तेव्हापासून मामा-भाच्यामध्ये सर्व काही ठीक असल्याची अटकळ बांधली जात आहे. दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आल्यानंतर दोघांचेही चाहते वाद निवळण्याची प्रतीक्षा करत आहेत. पण, गोविंदा कृष्णावर का नाराज आहे याचे कारण फारसं कोणाला माहित नाही.
गोविंदा यांनी एका मुलाखतीदरम्यान आपल्या नाराजीचे कारण सांगितले होते. मनिष पॉलसोबत संवाद साधताना गोंविदाने कृष्णा सोबत झालेल्या वादावर भाष्य केले. जवळपास एक वर्षाभरापूर्वी गोविंदाने मनिष पॉलच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. एका व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असून त्यात गोविंदाने म्हटले की कृष्णाला मुलगा झाला तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. तर, कृष्णाने मामा भेटायलाच आला नाही असे सांगितले.
गोविंदाने या पॉडकास्ट एक-दोन कारणे सांगितली. सांगितले की, ज्यावेळी कृष्णा-करिष्माला मुल झाले तेव्हा मी आणि सुनिता बाळाला पाहण्यासाठी हॉस्पिटलला गेलो. आम्ही बाळाला पाहिले. त्यावेळी आम्हाला बाळाला भेटण्यास मनाई करण्यात आली. एखाद्या संसर्गाच्या भीतीने बाळाला भेटण्यास दिले नसेल हे मी सुनिताला सांगितले. मात्र, कृष्णाने अनेकदा आपल्या मुलाखतीत म्हटले की गोविंदाने त्यांच्या मुलाला भेटला नाही. कृष्णाला यावर अनेकदा स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्याने माझं म्हणणं ऐकलं नाही.
विनोदावर गोविंदा नाराज...
गोविंदाने म्हटले की, शोमध्ये कृष्णाने माझ्याविरोधात अनेकदा कमेंट्स केल्या. त्यानंतर त्यांने सुनितावरही कमेंट्स केली. आता हे लेखक संवाद लिहून देत असतील तर त्याने विचार करायला पाहिजे. आमच्यात 'तू-तू मै-मै' नाही तर 'थी-थू थी-थू' का? असा प्रश्न मला पडला असल्याचे गोविंदाने सांगितले.
गोविंदाने आणखी एक किस्सा सांगताना म्हटले की, एका शोमध्ये कृष्णा डायलॉग बोलताना म्हणाला की मला शत्रूची गरज का आहे? घरात माझे मामा माझे शत्रू आहेत. आता मामा तुला शत्रू कसा वाटू लागला असे गोविंदाने विचारले. कृष्णाच्या तोंडी असलेला हा संवाद कोणी लेखकाने लिहिला नाही तर कृष्णाने स्वत: म्हटला असल्याचा दावाही गोविंदाने केला.
हे देखील आहे कारण
कृष्णाने काही वर्षांपूर्वी गोविंदाला आपल्या शोमध्ये आमंत्रित केले होते, परंतु गोविंदा या शोमध्ये जाण्याऐवजी कपिल शर्माच्या शोमध्ये गेला होता. ज्यानंतर कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने एक ट्विट केले. यामध्ये लिहिले होते, "काही लोक पैशासाठी नाचतात." यानंतर गोविंदा आणि त्याच्या पत्नीने कृष्णा आणि कश्मिरा यांच्यापासून अंतर ठेवले. मात्र, आरतीच्या लग्नाआधी कश्मिराने सासऱ्यांप्रमाणेच तिच्या मामाचेही मनापासून स्वागत करणार असल्याचे सांगितले होते आणि तसे घडले. गोविंदा लग्नाला पोहोचला, तिथे तो सगळ्यांना प्रेमाने भेटला आणि कश्मिरानेही त्याचे आशीर्वाद घेतले.
पाहा व्हिडीओ : गोविंदा कृष्णावर नाराज का?