Gadar 2 First Day Collection Prediction: सनी देवोलचा बहुचर्चित 'गदर 2' (Gadar 2) हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून हा चित्रपट बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल असा विश्वास त्याच्या निर्मात्यांना आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाल्यानंतर त्याच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 ते 110 कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


'गदर 2' हा चित्रपट या वर्षीचा सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजपासून ते अॅडव्हान्स बुकिंगपर्यंत 'गदर 2' चा धमाका पाहायला मिळत आहे. 9 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत 'गदर 2'साठी 3,91,975 तिकिटांची आगाऊ बुकिंग झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठी अपेक्षा आहे. 


'गदर 2' (Gadar 2) ची अॅडव्हान्स बुकिंग 'ब्रह्मास्त्र'ला चित्रपटाच्या बुकिंगशी स्पर्धा करत आहे आणि 'पठाण' नंतरचा या वर्षातील दुसरा सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग करणारा चित्रपट ठरला आहे. अशा परिस्थितीत, बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, गदर 2 पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 30 कोटी ते 35 कोटींची कमाई करू शकते, असे बोलले जात आहे. त्याच वेळी इतर काही अहवालांमध्ये सांगण्यात आलं आहे की हा चित्रपट पहिल्या दिवशी 40-45 कोटी रुपयांची कमाई करेल. ही कमाई एक प्रकारची रेकॉर्ड ब्रेक कमाई असेल. 


विशेष म्हणजे 'गदर 2' (Gadar 2) सोबतच अक्षय कुमारचा 'OMG 2' देखील 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अशा स्थितीत दोन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा होणार आहे. आगाऊ बुकिंगमध्ये 'OMG 2' सनी देओलच्या चित्रपटापेक्षा खूपच मागे असल्याचं दिसून येतंय. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, 'गदर 2'ने पहिल्या दिवशी 40-45 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली तर पहिल्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट 100 ते 110 कोटींचा आकडा पार करेल.


गदर 2 हा चित्रपट 23,500 हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज होणार


सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपटात उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर देखील दिसणार आहेत.'गदर 2' हा सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 2001 मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. तो चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. 11 ऑगस्ट रोजी 'गदर 2' देशभरातील 3,500 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे.


ही बातमी वाचा: