मुंबई : नवजात बाळासोबत नर्स विविध प्रकारच्या कसरती करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही आ वासला आहे.


व्हिडिओमध्ये दिसणारी महिनी चिनी किंवा पूर्व आशियाई वंशाची असण्याची शक्यता आहे. ती एका नवजात बाळाला हातात धरुन विविध कसरती करताना दिसत आहे. या कसरती बाळासाठी त्रासदायक नसून त्याचं शरीर लवचिक होण्यासाठी आवश्यक असाव्यात. चीनमध्ये नवजात बाळासोबत अशा कसरती करणं सर्वसामान्य मानलं जात असून भारतीयांसाठी ते आश्चर्यकारक आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र जफर शेख नावाच्या एका यूझरने ट्विटरवर शेअर करताना अमिताभ बच्चन यांना टॅग केलं आहे. 'हा व्हिडिओ पाहून समजतं की चिनी लोक नेहमी ऑलिम्पिक किंवा अन्य खेळांमध्ये इतकी पदकं कशी काय जिंकतात. यांना तर जन्मानंतर लगेचच ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली जाते.' असं जफरने म्हटलं आहे.

हा व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन यांनीही रिप्लाय केला आहे. 'चलो... हो गया' असं ट्वीट बिग बींनी केलं आहे. अनेक जणांनी हा व्हिडिओ मजेदार असल्याचं म्हटलं आहे, तर कोणी हे पाहून भीती वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पाहा व्हिडिओ :