The Great Indian Family Release Date: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'द ग्रेट इंडियन फॅमिली' (The Great Indian Family) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात विकी कौशलोबतच मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटाच्या टीमनं नुकताच एक  मजेदार व्हिडिओ शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.


'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट 22 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. नुकताच विकी कौशलनं या चित्रपटाचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या अतरंगी फॅमिलीबाबत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिल, "एक से बढ़कर एक, इस परिवार के रंग है अनेक। इसीलिये तो हम हैं - द ग्रेट इंडियन फ़ैमिली. 22 सितंबर को मिलते हैं!"






विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. हा  बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात सारा अली खाननं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. आता तो 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.






विकी कौशल हा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तो त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. उरी, मसान, राझी, संजू, सरदार उधम, मनमर्जियां, जरा हटके जरा बचके यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. विकीचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटामधील विकीच्या अभिनयानं अनेकांनी कौतुक केलं.


संबंधित बातम्या


Fighter motion poster: फायटर चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज; दीपिका, हृतिक रोशन आणि अनिल यांच्या लूकनं वेधलं लक्ष