Vicky Kaushal : टॉल-डार्क आणि हँडसम या तिन्ही गोष्टी बॉलिवूड अभिनेता विकी कौशलवर (Vicky Kaushal) एकदम परफेक्ट बसतात. विकीच्या पर्सनॅलिटीवर लाखो तरुणी फिदा आहेत. सर्वसामान्य तरुणींसह बॉलिवूडची कॅट अर्थात कतरिना कैफदेखील (Katrina Kaif) त्याच्यावर फिदा झाली. विकी आणि कतरिना लग्नबंधनात अडकले आहेत. बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता विकी कौशलने 16 मे 2024 रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. आजच्या घडीला सुपरस्टार असलेल्या विकी कौशलचं बालपण मुंबईतल्या चाळीत गेलं आहे. चाळीतूनच त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे इंजिनिअरची नोकरी सोडून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. पण संपत्तीत पत्नीचा वरचष्मा आहे.


16 मे 1988 रोजी मुंबईत जन्म झालेल्या विकी कौशलचे वडील बॉलिवूडचे लोकप्रिय अॅक्शन दिग्दर्शक आहेत. विकी कौशल हा श्याम कौशल यांचा मोठा मुलगा आहे. पण विकीला इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. अभिनेता होण्याआधी त्याने अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम केलं होतं. पुढे 'मसान'मध्ये मुख्य भूमिकेत काम करण्याची त्याला संधी मिळाली. विकी कौशलचा 'लव शव ते चिकन खुराना' (Luv Shuv Tey Chiken Khurana) हा चित्रपट हिट झाला नाही. पण अभिनेत्याच्या कामाचं मात्र प्रचंड कौतुक झालं. 






इंजिनिअर ते अभिनेता; 'असा' आहे विकी कौशलचा प्रवास


विकी कौशलने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे, हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने परदेशात नोकरी केली. पण परदेशात मन न रमल्याने तो पुन्हा भारतात आला. त्यानंतर किशोर नमित कपूर यांच्या कार्यशाळेत तो अभिनय शिकला. 


विकी कौशलचं नाव आज बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. विकीला 'उरी द सर्जिक स्ट्राइक' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले. 'उरी' या चित्रपटाच्या माध्यमातून विकी कौशल रातोरात सुपरस्टार झाला. जरा हटके जरा बचके, सॅम बहादुर, गोविंदा मेरा नाम सारख्या चित्रपटांमध्ये विकीने काम केलं आहे. विकी कौशलची संपत्ती 41 कोटी रुपये आहे. तर त्याची पत्नी कतरिना कैफची संपत्ती 224 कोटी रुपये आहे. म्हणजेच संपत्तीच्या बाबतीत विकी कौशलपेक्षा कतरिना कैफ आघाडीवर आहे. विकी कौशलच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Vicky Kaushal : 'धर्मरक्षक छावा हृदयी जगवावा', विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा