Christine McVie: प्रसिद्ध बँड फ्लीटवुडच्या (Fleetwood) सदस्य असणाऱ्या गायिका आणि गीतकार क्रिस्टीन मॅकवी (Christine McVie) यांचे निधन झाले आहे. क्रिस्टीन मॅकवी यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. क्रिस्टीन मॅकवीच्या कुटुंबाने तिच्या निधनाची माहिती फेसबुक (Facebook) पेजवर शेअर केली. क्रिस्टीन मॅकवी यांच्या कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टीन मॅकवी दीर्घकाळापासून आजारी होत्या त्यामुळे रुग्णालयात त्यांचे निधन झाले. 'प्रत्येकाने क्रिस्टीन यांना त्यांच्या हृदयात ठेवावे. त्यांचे जीवन लक्षात ठेवावे अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या संगीताला जगभरातून प्रेम मिळाले होते.' असं त्यांच्या कुटुंबानं सांगितलं. 


फ्लीटवुड बँडनं वाहिली श्रद्धांजली


फ्लीटवुड बँडनं एक ट्वीट शेअर करुन क्रिस्टीन मॅकवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'क्रिस्टीन मॅकवीच्या निधनामनंतर दु:ख व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. त्या खूप टॅलेंडेड होत्या. त्या आमच्या बँडच्या सर्वोत्तम संगीतकार होत्या आणि त्या आमच्या मैत्रीण होत्या. तिच्यासोबत आम्हाला काही क्षण घालवता आहे, त्याबद्दल आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो.  आम्ही क्रिस्टीनवर मनापासून प्रेम करतो. तिची आम्हाला खूप आठवण येईल.'






क्रिस्टीन यांचा जन्म 12 जुलै 1943 रोजी नॉर्थ वेस्ट इंग्लंडमध्ये (England) झाला. क्रिस्टीन मॅकव्ही या 1970 मध्ये  फ्लीटवुड बँडमध्ये सामील झाले होते. फ्लीटवुड 1970 आणि 80 च्या दशकात जगातील सर्वात प्रसिद्ध रॉक बँड बनले. 1977 मध्ये, बँडसह त्याचा Rumors या अल्बमच्या 40 मिलियनपेक्षा अधिक कॉपीज विकल्या गेल्या.  ‘लिटिल लाइज’, ‘एवरीवेयर’, ‘डोंट स्टॉप’, ‘से यू लव मी’ आणि ‘सोंगबर्ड’ या चित्रपटांमुळे  क्रिस्टीन यांना विशेष लोकप्रियता मिळाली. 


1998 मध्ये रॉक एन रोल हॉल ऑफ फेममध्ये क्रिस्टीन मॅकवीमध्ये यांच्या नावाचा समावेश झाला. त्याच वर्षी, त्यांच्या द डान्स या अल्बमला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 1998 मध्ये क्रिस्टीन मॅकव्ही यांनी  फ्लीटवुड बँड सोडण्याचा निर्णय घेतला होता पण नंतर 2014 त्या पुन्हा या बँडमध्ये सहभागी झाल्या. संगीतातील उत्कृष्ट योगदानासाठी ब्रिट पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 1 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!