Virajas Shivani Wedding : मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. शिवानी रांगोळेच्या हातावर विराजस कुलकर्णीच्या नावाची मेहंदी लागली आहे. 


मेहंदी सोहळ्यातील व्हिडीओ शिवानीने सोशल मीडियावर शेअर केले आहे. मेहंदी सोहळ्यातील शिवानीचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.  विराजस-शिवानीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या नात्याविषयी माहिती दिली होती. आता येत्या 3 मे ला विराजस आणि शिवानी लग्नबंधनात अडकणार आहेत.





शिवानी आणि विराजस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ते नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. 'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून विराजस घराघरांत पोहोचला होता. तर 'बन मस्का' या मालिकेतून शिवानीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. विराजस हा लेखक आणि दिग्दर्शकदेखील आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Shahir : शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' लवकरच येणार रुपेरी पडद्यावर


Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेत पुन्हा दिसणार पावनखिंड फेम अजय पुरकर


Baloch : अपरिचित लढ्याची शौर्यगाथा! प्रवीण तरडेंचा 'बलोच' दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर येणार प्रेक्षकांच्या भेटीला