Irrfan Khan : बॉलिवूड अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. इरफान खान यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. इरफानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इरफान यांचा 'अपनों से बेवफाई' (Apno Se Bewafai) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


इरफान खान यांनी अचानक जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे अनेक सिनेमे अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत. अशातच त्यांनी शूटिंग पूर्ण केलेल्या एका सिनेमासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. इरफान खान यांचा 'अपनों से बेवफाई' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.





'अपनों से बेवफाई' या सिनेमाचे दिग्दर्शन पियुष शाह यांनी केले आहे. हा सिनेमा 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोना प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 'अपनो से बेवफाई' या सिनेमाव्यतिरिक्त इरफानचे चाहते त्यांच्या 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 


संबंधित बातम्या


Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेत पुन्हा दिसणार पावनखिंड फेम अजय पुरकर


Baloch : अपरिचित लढ्याची शौर्यगाथा! प्रवीण तरडेंचा 'बलोच' दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Mahesh Manjrekar : मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती; महेश मांजरेकरांनी केली आगामी सिनेमाची घोषणा