Riteish Genelia Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) बहुचर्चित 'वेड' (Ved) सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या ट्रेलरमध्ये रितेश आणि जेनिलियाचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना श्रावणी आणि सत्याच्या अनोख्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. 


'वेड'च्या ट्रेलरमध्ये काय आहे?


ट्रेलरमध्ये रितेश-जेनिलियाच्या रोमॅंटिक अंदाजासोबत त्यांचं बिनसलेलं नातं स्पष्ट दिसत आहे. दोघांनीही एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम केलं आहे. पण लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. प्रेम तू ही केलंस आणि मी ही, वेड तुझ्यातही आहे आणि माझ्यातही, बायकोच्या पगारावर जगताना लाज नाही वाटत, असे ट्रेलरमधील दमदार डायलॉग प्रेक्षकांना 'वेड' (Ved) लावत आहेत. 




'वेड' या सिनेमातील गाण्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जेनिलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तर दिग्दर्शक म्हणून रितेशचा हा पहिलाच सिनेमा आहे. तसेच रितेश आणि जेनिलियाने या सिनेमाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यांनी 'देश म्युझिक' या नावाचं एक म्युझिक लेबल सुरू केलं आहे. 


30 डिसेंबरला 'वेड' प्रेक्षकांच्या भेटीला 


ट्रेलरमधील रितेश-जेनिलियासह विद्याधर पाठारे आणि अशोक सराफ यांच्या अभिनयाचंदेखील प्रचंड कौतुक होत आहे. हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीजआधीच हा सिनेमा सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सिनेमांच्या यादीत (IMDB) पहिल्या क्रमांकावर आहे. 


'वेड' या सिनेमात जेनेलिया देशमुख, रितेश देशमुख, अशोक सराफ, विद्याधर जोशी आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत आहेत. तर आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहे. तर मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार आहे. आता रितेश-जेनिलियाचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 



संबंधित बातम्या


Ved Teaser: 'नव्या प्रवासाची सुरवात करतो'; रितेशनं शेअर केला 'वेड'चा टीझर