Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie Budget : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) बहुचर्चित 'वेड' (Ved) हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. 


'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रिलीजच्या 10-12 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाची निर्मिती 15 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने कमाईच्या दुप्पट कमाई कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 35 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'वेड' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 20.67 कोटींची कमाई केली होती. गेल्या काही दिवसांपासून रितेश-जिनिलियाचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होऊन आता 15 दिवस होत आले असले तरी चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. 






वर्षाच्या सुरुवातीला मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवणारा 'वेड' 


'वेड' या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीला मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिज पाहणाऱ्या तरुणांना सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम करतो आहे. सिनेमासह या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 


'वेड' या सिनेमाद्वारे जिनिलिया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. तर रितेश देशमुखने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रितेश-जिनिलियादेखील आपल्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.


संबंधित बातम्या


Ved Box Office Collection : लय भारी! रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ची आठ दिवसांत कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...