Naatu Naatu: सध्या जगभरात 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याची चर्चा होत आहे. या गाण्याला नुकताच ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार मिळाला आहे. जगभरातील लोक आरआरआर चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत आहेत. 'नाटू नाटू' गाण्यामधील ज्युनियर एनटीआर, राम चरण यांच्या डान्स स्टेप्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता हे गाणं शूट कसं झालं? तसेच या गाण्याच्या मेकिंगचे किस्से याबाबत अनेकांना माहिती नसेल. त्याबद्दल जाणून घेऊयात...
अशी झाली नाटू नाटूची निर्मिती
नाटू नाटू गाण्यामधील ज्युनियर एनटीआर, राम चरणच्या एनर्जीनं आणि डान्सनं अनेकांचे लक्ष वधले, अनेक लोकांनी या गाण्याचं कौतुक केलं. या गाण्याचे संगीत एमएम किरवाणी यांनी दिले असून चंद्रबोस यांनी लिहिले. एका मुलाखतीमध्ये एम एम कीरावानी यांनी सांगितलं की, एस. एस. राजामौली यांनी नाटू नाटू गाण्याच्या निर्मितीची जबाबदारी मला दिली होती. मी गीतकार चंद्रबोस यांना हे गाणं लिहिण्यास सांगितलं. मी त्याला सांगितलं की, दोन कलाकार डान्स करुन लोकांमध्ये उत्साह निर्माण करतील, असं हे गाणं पाहिजे. पण हे करताना ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं होतं की, या चित्रपटात 1920 चा काळ दाखवण्यात आला आहे. त्यामुळे गाण्याचे शब्द देखील तसेच हवे.
एस. एस राजामौली, कीरावानी आणि चंद्रबोस यांनी 17 जानेवारी 2020 पासून या गाण्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत चंद्रबोस यांनी गाण्याचा काही भाग लिहिला आणि मग कीरावानी यांची भेट घेतली. कीरावानी यांना गाणं खूप आवडलं. गाण्याचे 90 टक्के काम दोन दिवसांत पूर्ण झाले, पण संपूर्ण गाणं तयार होण्यासाठी 19 महिने लागले.
युक्रेनमध्ये झाले शूटिंग
नाटू-नाटू या गाण्याचे शूटिंग युक्रेनमधील वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. याबद्दल दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. तसेच आरआरआर चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन देखील युक्रेनमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Golden Globe Awards 2023: कौतुकास्पद! आरआरआरमधील 'नाटू नाटू' गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार