Vashu Bhagnani Akshay Kumar :  बॉलिवूडमध्ये कधीकाळी आपल्या बळावर सुपरहिट चित्रपटांचा धडाका लावलेला अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवत नाही. मागील काही वर्षांपासून अक्षय कुमारचे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप होत आहेत. या फ्लॉप चित्रपटांमुळे निर्मात्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याच फ्लॉप चित्रपटांमुळे  बॉलिवूडचे नावाजलेले दिग्गज निर्माते वासू भगनानी (Vashu Bhagnani) यांचे दिवाळं निघाले असल्याची चर्चा सुरू आहे. अक्षय कुमार, टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असलेली 'बडे मियाँ, छोटे मियाँ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर डिझास्टर ठरल्याने भगनानी यांना मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. या चित्रपटामुळे आपल्यावरील कर्जे उतरतील असा विश्वास वासू भगनानी यांना होता.



वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेन्मेंट या प्रोडक्शन हाऊसने 'बिवी नंबर 1' , 'कुली नंबर 1', 'हिरो नंबर 1' यासारख्या हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. वासू भगनानी हे रितेश देशमुखचा भाऊ धीरज देशमुख याचे सासरे आहे. वासू भगनानी यांची कन्या आणि जॅकी भगनानी यांची बहीण पूजा हिचा विवाह धीरजसोबत झाला आहे. मात्र, कोविड महासाथीचा फटका प्रोडक्शन हाऊसला बसला. वासू भगनानी यांनी 150 कोटींच्या बजेटमध्ये  बेल बॉटम या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र, चांगला विषय असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करू शकला नाही. बेल बॉटमने फक्त 26.50 कोटींची कमाई केली. 


250 कोटींचे होते कर्ज


'बॉलिवूड' हंगामाच्या वृत्तानुसार, अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज'ही फ्लॉप ठरला. त्याचवेळी नेटफ्लिक्सने टायगर श्रॉफच्या 'गणपत'चे हक्क विकत घेण्यासही नकार दिला होता. वृत्तानुसार, पूजा एंटरटेनमेंट कंपनीवर 250 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे त्यांना त्यांचे सात मजली कार्यालय विकावे लागले.


वृत्तानुसार,  कंपनीची आर्थिक स्थिती धोक्यात असल्याची चिन्ह आधीच दिसू लागली होती. मात्र, 'बडे मियाँ, छोटे मियाँ' या चित्रपटाच्या हाय बजेटमध्ये कंपनी आर्थिक स्थिती नाजूक झाली. चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफची भूमिका असलेल्या चित्रपटामुळे कंपनीची आर्थिक स्थिती चांगली होईल असा अंदाज होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. त्यामुळे वासू भगनानी यांना आपल्यावरील मोठे कर्ज उतरवण्यासाठी इमारत विकण्याशिवाय काही पर्याय उरला नाही. त्याशिवाय, त्यांनी जवळपास 80 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे. वाशू भगनानी यांनी आपले ऑफिस आता जुहू येथील 2 बीएचकेच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट केले आहे. 


आधीच धोक्याची अस चिन्हे दिसत होती आणि बडे मियाँ छोटे मियाँच्या उच्च बजेटमुळे ती आणखीच बिकट झाली होती. तरीसुद्धा, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत हा चित्रपट आपली आर्थिक स्थिती सुधारेल अशी फर्मला आशा होती. पण हाही फ्लॉप ठरला. त्यानंतर मोठ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वाशूकडे इमारत विकण्याशिवाय पर्याय नव्हता. याशिवाय, सुमारे 80% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे आणि वाशू भगनानी यांनी त्यांचे कार्यालय जुहू येथील 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये हलवले आहे.