Varun Dhawan Movies IMDB Rating : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) वैयक्तिक आयुष्यासह त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. येत्या 24 एप्रिलला वरुण त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करणार आहे. यंदाचा त्याचा वाढदिवस खूपच खास आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याचे 'भेडिया' (Bhediya) आणि 'जुग जुग जिओ' (Jugjugg Jeeyo) हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. वरुणच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या आयएमडीबी रेटिंगमधल्या (IMDB Rating) वरुणच्या सर्वाधिक रेटिंग असलेल्या सहा सिनेमांबद्दल...
IMDB वरील वरुण धवनचे सर्वाधिक रेटिंग असलेले 'टॉप 6' सिनेमे (Varun Dhawan Top 6 Highest Rated Movies on IMDb)
1. ऑक्टोबर (October) - वरुण धवनच्या 'ऑक्टोबर' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. या सिनेमाला 7.5 रेटिंग मिळाले आहे. या रोमॅंटिक सिनेमात वरुणसह बनिता संधू आणि गिंताजली राव महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
2. बदलापूर (Badlapur) - वरुणचा 'बदलापूर' हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर असून या सिनेमाला 7.4 रेटिंग मिळाले आहे. 'बदलापूर' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी, यामी गौतम, राधिका आपडे अशी तगडी स्टारकास्ट होती.
3. भेडिया (Bhediya) - भेडिया या वरुणच्या बहुचर्चित सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.3 रेटिंग मिळाले आहे. थरार नाट्य असलेला 'भेडिया' हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे.
4. सुई धागा : मेड इन इंडिया (Sui Dhaaga : Made In India) - वरुणचा 'सुई धागा : मेड इन इंडिया' हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर असून या सिनेमाला 6.8 रेटिंग मिळाले आहे. या सिनेमात वरुणसह अनुष्का शर्मा स्क्रीन शेअर करताना दिसली होती. वाराणसीतील सैय्यद आसिफ हसन या 26 वर्षीय मुलाच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.
5. बद्रीनाथ की दुल्हनिया (Badrinath Ki Dulhania) - 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 6.1 रेटिंग मिळाले आहे. या सिनेमात प्रेक्षकांना रोमान्स आणि नाट्य पाहायला मिळालं होतं.
6. जुग जुग जिओ (Jug Jug Jeeyo) - वरुणच्या 'जुग जुग जिओ' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 6.1 रेटिंग मिळाले आहे. या सिनेमात वरुणसह कियारा आडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर आणि प्राजक्ता कोळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. या विनोदी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहताने सांभाळली होती.
संबंधित बातम्या