Baby John Release Date : अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) त्याच्या आगामी चित्रपटामुळे (Upcoming Movie) सध्या चर्चेत आहे. 'बेबी जॉन' (Baby John) चित्रपटाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी वरुण धवनने बॉडी डबलचा वापर केला नसल्याचं समोर आला आहे. या चित्रपटातील ॲक्शन सीन्ससाठी बॉडी डबलचा वापर न करता वरुनने सर्व धोकादायक सीन्स केलं असल्याच सांगितलं जात आहे. 


बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका


'बेबी जॉन' चित्रपट वरुण धवन ॲक्शन सीन्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाती चाहत्यांना त्याचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत आता नवी अपडेट समोर आली आहे. 'बेबी जॉन' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख आता समोर आली आहे. वरुण धवन ख्रिसमसच्या दिवशी नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाताळ म्हणजेच 25 डिसेंबरला वरुण धवनचा 'बेबी जॉन' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


बॉडी डबलचा वापर नाही


यंदाचा ख्रिसमस अभिनेता वरुण धवनच्या चाहत्यांसाठी फारच खास ठरणार आहे. 'बेबी जॉन' चित्रपट एक उत्तम ॲक्शन एंटरटेनर असणार आहे. चित्रपटातील बहुतांश स्टंट वरुणनेच केले आहेत, जे पाहून चाहतेही आश्चर्य होतील. चित्रपटातील दमदार ॲक्शनमुळे तो या वर्षातील सर्वात मोठा ॲक्शन मनोरंजन करणारा चित्रपट ठरणार असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटातील धोकादायक ॲक्शन सीन्स वरुण धवनने बॉडी डबलशिवाय केले आहेत.


'बेबी जॉन' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित


नुकतीच या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट सुरुवातीला 31 मे रोजी प्रदर्शित होणार होता, पण नंतर तो पुढे ढकलण्यात आला. आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. वरुण धवनने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करत चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. बेबी जॉन चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.


वरुन धवनची इंस्टाग्राम पोस्टद्वारे घोषणा




महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nawazuddin Siddiqui : धर्मामुळे नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बॉलिवूडमध्ये भेदभाव झाला? अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं...