मुंबई : बॉलिवूडचा 'हिरो नंबर 1' गोविंदा (Govinda) अलिकडे चित्रपटांपासून दूर आहे. लोकसभा निवडणुकीत गोविंदा शिवसेना शिंदे गटाचा प्रचार करताना दिसला होता. गोविंदा सध्या चित्रपटांपासून दूर असला तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचे भाचा कृष्णासोबतचे मतभेद समोर आले होते, त्यामुळे तो प्रकाशझोतात आला होता. आता गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गोविंदाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहताच चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.


मंदिराऐवजी चर्चेमध्ये पोहोचला गोविंदा


गोविंदाचे चाहते त्याच्याबाबतची प्रत्येक अपडेट जाणण्यासाठी उत्सुक असतात. गोविंदा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो आणि चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करतो. नुकतान गोविंदाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून संताप व्यक्त होत आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी गोविंदाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


गोविंदाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला


गोविंदाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदा चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्तासमोर हात जोडलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी प्रचंड संतापले आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सना हा व्हिडीओ अजिबात आवडलेला नाही आणि त्यांनी गोविंदाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मंदिर सोडून चर्चमध्ये गेल्यामुळे सोशल मिडिया युजर्स गोविंदावर संतापले आहेत.


नेटकऱ्यांनी गोविंदाला केलं ट्रोल


गोविंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी गोविंदाला ट्रोल केलं आहे. या व्हिडीओवर सातत्याने कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिलं, गोविंदा, तू कसा हिंदू आहेस? दुसऱ्याने लिहिलं 'गोविंदा येशू ख्रिस्ताचे अनुयायी'. आणखी एका युजरेने लिहिलं आहे 'भगवान शंकराकडे जा, दुसरीकडे नाही.' आणखी एका युजरने लिहिलं आहे की, 'हा व्हिडीओ पाहून मी तुला अनफॉलो करत आहे.'


पाहा व्हायरल व्हिडीओ






चित्रपटांपासून दूर असलेला गोविंदा आजही 'हिरो नंबर 1'


गोविंदा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असला, तरी आजही त्याच्या चाहत्यांमध्ये कमी नाही. चाहत्यांच्या मनात आजही गोविंदा 'हिरो नंबर 1' आहे. गोविंदाने 1986 मध्ये 'लव्ह' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली, त्यानंतर त्याने अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, दमदार कॉमेडी, रोमान्सने त्याने बॉलिवूडमध्ये तसेच त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 37-38 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 165 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.