Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात सिनेमाच्या, नाटकाच्या प्रमोशनसाठी कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते येत असतात. हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांचे प्रमोशनदेखील 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर केले जाते. या कार्यक्रमाच्या आगामी भागात 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) सिनेमातील कलाकार हजेरी लावणार आहेत. 


'चला हवा येऊ द्या'च्या आगामी भागात 'जुग जुग जिओ' सिनेमातील कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवानीचे 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कलाकारांनी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर चांगलाच कल्ला केला आहे. सिनेमातील ‘नाच पंजाबन’ या गाण्यावर वरुण डान्स करणार आहे. 


24 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित


कियारा अडवाणी, वरुण धवनचा 'जुग जुग जिओ' हा सिनेमा 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा विनोदी सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहता यांनी सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या सिनेमात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी दिसणार आहे. 


नीतू कपूर आणि अनिल कपूर 'जुग जुग जिओ' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Jug Jugg Jeeyo Trailer : 'जुग जुग जिओ' ट्रेलर रिलीज; प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत


Jug Jug Jeeyo Song : 'जुग जुग जिओ' सिनेमातील 'दुपट्टा' गाणं रिलीज; पार्टी सॉंगने घातला धुमाकूळ