Jug Jugg Jeeyo Trailer : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्यांच्या आगामी 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 


दोन मिनिटे 56 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये एका कुटुंबाचे अनेक रंग पाहायला मिळत आहेत. विवाहित जोडप्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहता यांनी सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 'जुग जुग जिओ' हा सिनेमा 24 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या सिनेमात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी हे कलाकार दिसणार आहेत. 'जुग जुग जियो' या सिनेमाव्यतिरिक्त कियारा आणि वरुण त्यांच्या इतर सिनेमांमध्येदेखील व्यस्त आहेत. कियारा कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया 2' या हॉरर, विनोदी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा सिनेमा 20 मे ला रिलीज झाला आहे. तर वरुण धवन अभिनेता जान्हवी कपूरसोबत 'बेडियां' आणि करण जोहरच्या 'बवाल' सिनेमात दिसणार आहे.






नीतू कपूर आणि अनिल कपूर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 20 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील कलाकारांनी आता सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


संबंधित बातम्या


Jug Jugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' चे मोशन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित


'Jug Jugg Jeeyo' Release Date: कियारा आडवाणी, वरुण धवनचा आगामी 'जुग-जुग जियो' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित