Varun Dhawan : वरुण धवन (Varun Dhawan) हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. वरुण कॉलेजच्या दिवसांत पोट भरण्यासाठी मद्यविक्री व्यवसाय करत होता. अभिनेत्याने नुकत्याच एका मुलाखतीत यासंदर्भात खुलासा केला आहे.
वरुण धवनचे (Varun Dhawan) वडील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आहे. पण वडील दिग्दर्शक असल्याचा वरुणने कधीही फायदा घेतला नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर वरुणने स्वत:ला सिद्ध केलं. आता एका मुलाखतीत वरुणने कॉलेजच्या दिवसांत पैसे कमावण्यासाठी मद्यविक्रीचा व्यवसाय करत असल्याचं सांगितलं आहे.
वरुणच्या वडिलांचे नाव डेविड धवन असे आहे. आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरअंतर्गत वरुणला लॉन्च करण्यासाठी डेविड यांनी स्पष्ट नकार दिला होता. लेकाने स्वत: काम मिळावावं आणि स्वत:ला सिद्ध करावं, अशी त्यांची इच्छा होती. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे वरुणने खूप मेहनत घेतली. अखेर या मेहनतीला फळ मिळालं. करण जोहरच्या (Karan Johar) 'स्टूडंट ऑफ द ईयर' (Student of the Year) या सिनेमाच्या माध्यमातून वरुणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
वरुण धवनने 'स्टूडंट ऑफ द ईयर' (Student Of The Year) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्याचा पहिलाच सिनेमा सुपरठिट ठरला. त्यानंतर वरुणची फॅन फॉलोइंगदेखील वाढली. 'चॉकलेट बॉय' म्हणून तो ओळखला जाऊ लागला. पुढे 'बदलापुर' या सिनेमाच्या माध्यमातून तो एक अभिनेता म्हणून सर्वांपर्यंत पोहोचला.
वरुणचा मोठा संघर्ष
'स्टूडंट ऑफ द इयर' हा वरुणचा पहिला सिनेमा होता. पण या सिनेमाआधी 2010 मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) 'माय नेम इज खान' (My Name is Khan) या सिनेमासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. मोठा संघर्ष केल्यानंतर वरुण आज बॉलिवूडचा एक आघाडीचा अभिनेता झाला आहे. कॉलेजमध्ये असताना वरुण पैसे कमावण्यासाठी एका मद्यविक्रीच्या दुकानात काम करत असे.
वरुण धवनने नॉटिंघम यूनिवर्सिटीमधून शिक्षण घेतलं आहे. लहानपणापासून सिनेमांत काम करण्याची वरुणची इच्छा होती. पण काही कारणांनी त्याला करता आलं नाही. वरुणने नताशा दलालसोबत लग्न केलं आहे. लहानपणापासून वरुण आणि नताशा एकमेकांना ओळखत होते. त्यांची चांगली मैत्री होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
संबंधित बातम्या