Nana Patekar : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या त्यांच्या 'ओले आले' (Ole Aale) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. येत्या 5 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नाना सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहेत. दरम्यान झी या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना नानांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नरेंद्र मोदी (Naredra Modi) देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.


मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार : नाना पाटेकर


'झी'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते नाना पाटेकर म्हणाले,"आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील. तसेच भाजपाला पर्याय नाही. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा प्रंतप्रधान होणार". नाना पाटेकरांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


नाना पाटेकरांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील असं भाकित त्यांनी केलं आहे. देशभरात मोदी सरकार शानदार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच त्यांना यश नक्कीच मिळेल. भाजपला बहुमत मिळणार आणि नरेंद्र मोजी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार". 






लोकसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष


एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणूक होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सगळे राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीत भाजपाला यश मिळालं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणार, असं भाकित नाना पाटेकरांनी केलं आहे. नानांचं भाकित आता खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


नाना पाटेकर 'या' कारणाने आलेले चर्चेत


नाना पाटेकर काही दिवसांपूर्वी चाहत्याच्या कानाखाली वाजवल्यामुळे चर्चेत आले होते. शूटिंगदरम्यान एक चाहता त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गेला असता त्यांनी सेल्फी न देता त्याला कानाखाली वाजवली. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली.


संबंधित बातम्या


Nana Patekar : 50 वर्षांच्या करिअरमध्ये एकाही दिग्दर्शकाने सिनेमासाठी विचारणा केली नाही; नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत