Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आपल्या व्यावसायिक कामांसह वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिचं नाव भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) जोडलं जात आहे. उर्वशी आणि ऋषभचं अफेअर असल्याची चर्चा आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृतरित्या काहीही माहिती दिलेली नाही. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ते चर्चेत आहेत. उर्वशीने ऋषभ पंतसाठी केलेल्या एका कृतीने नेटकरी हैराण झाले आहेत. 'IPL 2024'मध्ये ऋषभ चांगला खेळावा त्याचा विजय व्हावा यासाठी उर्वशीने अनवाणी 46 किलोमीटर प्रवास करत देवाकडे प्रार्थना केली आहे.


स्पॉटबॉयच्या एका वृत्तानुसार, ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हा उर्वशी रौतेला त्याला भेटायला रुग्णालयात गेली होती. त्यावेळी क्रिकेटर लवकर मैदानात यावा यासाठी उर्वशीने नवस केला होता. आता अभिनेत्रीने नवस पूर्ण झाला आहे. उर्वशी रौतेलाने अनवाणी चालत आपला नवस पूर्ण केला आहे.


उर्वशी भर दुपारी 46 किलोमीटर अनवाणी चालत गेली


उर्वशी रौतेलाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उर्वशी रौतेला भर दुपारी 46 किलोमीटर चालत तारा बाबा यांच्याकडे गेली आहे. ऋषभ पंतसाठी तिने देवाकडे प्रार्थना केली आहे. उर्वशीच्या या कृतीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. तर काही नेटकरी मात्र तिला ट्रोल करताना दिसून येत आहेत. 


उर्वशी रौतेलामुळे रिषभ पंतला होतोय त्रास


ऋषभ पंतसाठी उर्वशी रौतेलाचं एकतर्फी प्रेम असल्याचं म्हटलं जात आहे. उर्वशी रौतेलाच्या त्रासाला कंटाळून ऋषभ पंतने इंस्टा स्टोरी शेअर केली होती. त्याने लिहिलं होतं,"माझ्या मागे लागणं सोड बहिणी...". ऋषभने ही पोस्ट शेअर केली खरी तर त्यानंतर काळी वेळातच त्याने ही पोस्ट डिलिट केली. उर्वशीने काही दिवसांपूर्वीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. उर्वशीने काही दिवसांपूर्वी मॅट्रीमोनियल जाहिरात शूट केली होती. यातील क्रिकेटर्सच्या उंचीवरुन नेटकऱ्यांनी मजा घेतली. त्यामुळे ऋषभच्या चाहत्यांनी उर्वशीची शाळा घेतली होती. 


ऋषभ पंत सध्या 'आयपीएल 2024' (IPL 2024) मुळे चर्चेत आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या टीमचा तो कॅप्टन आहे. अपघातानंतर 454 दिवसानंतर ऋषभने मैदानावर कमबॅक केलं आहे. आता उर्वशीच्या कृतीने सर्व हैराण झाले आहेत. ऋषभचं जोरदार कमबॅक क्रिकेटप्रेमींसाठी आनंददायी ठरलं आहे.


कोण आहे उर्वशी रौतेला? (Who is Urvashi Rautela)


उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 'विश्वसुंदरी 2015' या बहुप्रतिष्ठित स्पर्धेत तिने भारताचं नेतृत्व केलं होतं. 'सिंह साब द ग्रेट' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. उर्वशी रौतेलाच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Rishabh Pant Urvashi Rautela : ऋषभ पंतसोबत संसार थाटणार उर्वशी रौतेला? अभिनेत्री म्हणाली,"जोडीदार म्हणून हवाय संस्कारी, सालस अन् साधा सरळ मुलगा"