Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पोस्ट आणि फॅशन स्टाईलमुळे चर्चेत आहे. भाजप नेत्या  चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. आता नुकतेच उर्फीनं तालिबानच्या फतव्याबाबत  एक ट्वीट शेअर केले. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


'तालिबानने पुरुष डॉक्टरांना महिला रुग्णांवर उपचार न करण्याचे आदेश दिले आहेत. मग, जर महिलांना विद्यापीठातून बंदी घातली गेली,  डॉक्टर होण्यासाठी त्यांना अभ्यास करता येत नसेल, तसेच पुरुष डॉक्टरांना महिलांवर उपचार करता येत नसतील, तर महिलांनी काय करावे? आजाराने मरावे?' असं उर्फीनं ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोला उर्फीनं कॅप्शन दिलं, 'एक दिवस महिलाच तालिबानचा अंत करतील.' उर्फीच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 






तालिबानच्या फतव्या संदर्भात आणखी एक फोटो उर्फीनं शेअर केला. या फोटोला उर्फीनं कॅप्शन दिलं, 'इस्लामिक विद्वान आणि मौलवी अजूनही का शांत आहेत?'






भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती.  उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता याच वादादरम्यान उर्फीनं शेअर केलेल्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 


अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात. एका मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं की, 'ऐ मेरे हमसफर, जीजी मां, मेरी दुर्गा, बेपनाह, चंद्र नंदिनी या शोमध्ये काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: