Kuttey Box office Collection:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांचा मुलगा आसमान भारद्वाजचा  'कुत्ते' (Kuttey) हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. पण आता या चित्रपटाचा ओपनिंग-डेचे कलेक्शन समोर आले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. 


कुत्ते चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अभिनेता अर्जुन कपूरनं (Arjun Kapoor) कुत्ते या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक जण हा चित्रपट रिलीज होण्याची वाट बघत आहेत. रिपोर्टनुसार, कुत्ते चित्रपटानं पहिल्या दिवशी जवळपास 1.5 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरबरोबरच या चित्रपटात कुमुद मिश्रा, नसीरुद्दीन शाह, तब्बू, कोंकणा सेन, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज या कलाकारांनी देखील कुत्ते चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. कुत्ते चित्रपटात काही सिन्समध्ये तुम्हाला डार्क कॉमेडीच्या छटा पाहायला मिळतील. 






चित्रपटातील कलाकारांनी घेतलं एवढं मानधन
कुत्ते या चित्रपटाची निर्मिती 35 कोटींमध्ये करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जाणून घेऊयात या कलाकांनी चित्रपटाबद्दल घेतलेल्या मानधनाबद्दल...
अर्जुन कपूर- 8 कोटी
राधिका मदन-1 कोटी
तबू-3.5 कोटी 
कोंकणा सेन शर्मा-85 लाख 
नसीरुद्दीन शाह-50 लाख
कुमुद मिश्रा- 70 लाख 
शार्दुल भारद्वाज-30 लाख


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Rakhi Sawant: लग्नाच्या चर्चेवर अखेर आदिलनं सोडलं मौन; म्हणाला, 'हो, मी राखीसोबत लग्न केलंय, पण सध्या...'