Urfi Javed : बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी विरुद्ध चित्रा वाघ या ट्विटर वॉरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाची आता पोलिसांनीदेखील दखल घेतली आहे. उर्फीने आज मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर एक ट्वीट करत देशाची तालिबानसोबत तुलना केली आहे.
मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर उर्फीने प्राचीन फोटो शेअर करत ट्वीट (Urfi Javed Tweet) केलं आहे,"प्राचीन हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करत असे. तेव्हा हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते. स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती. खेळ राजकारणात स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता. ते लिंगाबद्दल सकारात्मक असणारे लोक होते".
उर्फीने दुसरं ट्वीट केलं आहे,"बलात्कार, डान्सबार, कपड्यांवरुन एखाद्याला मारणं हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही. एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे. तो स्त्रियांच्या बाबतीत खूप उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कोणत्या संस्कृतीबद्दल बोलत आहात?"
पोलीस चौकशीनंतर उर्फीने ट्विटचा धडाका सुरू केला आहे. अतरंगी कपड्यांवरुन सुरू झालेला वाज आता देशाची तालिबानशी तुलना आणि हिंदू संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापर्यंत पोहोचला आहे. आता वादाची फोडणी टाकणाऱ्या उर्फीला हिंदुत्ववादी काय उत्तर देणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या