Urfi Javed Tomato Earrings : आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद (Urfi Javed) कायम चर्चेत असते. चित्रविचित्र कपड्यांमुळे अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकते. पण तरीही वेगवेगळे लूक करत ती चाहत्यांना थक्क करते. दररोज वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करत ती तिचा लूक पूर्ण करत असते. आता उर्फीने चक्क टोमॅटोचे कानातले घातले आहेत. 


उर्फी जावेदचा नवा लूक (Urfi Javed New Look)


उर्फीने टोमॅटोचा वापर करत तिचा नवा लूक बनवला आहे. टोमॅटोच्या भाव वाढीचा उर्फीला चांगलाच फायदा झाला आहे. उर्फीने सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि वन साइट क्रॉप टॉप परिधान केला आहे. तसेच ते टोमॅटो खातानाही दिसत आहे. हाय बन आणि न्यूड मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. पण या सगळ्यात भाव खाऊन गेलेत ते उर्फीचे कानातले. 


उर्फाने टोमॅटोचे कानातले घातले आहेत. टोमॅटोचे कानातले घातलेले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत उर्फीने खास कॅप्शनदेखील लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"टोमॅटो आता नवीन सोनं आहे". उर्फीचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 




टोमॅटोच्या वाढत्या दर वाढीमुळे सर्वसामान्यच नव्हे तर सेलिब्रिटीदेखील चिंता व्यक्त करत आहेत. सुनील शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की,"टोमॅटोच्या दर वाढीचा परिणाम त्यांच्या जेवणावरही झाला आहे. ते आता टोमॅटो कमी खाऊ लागले आहेत". 


सुनील शेट्टी म्हणाले होते,"ताजे पदार्थ खायला आम्हाला आवडतात. टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत आणि त्याचा परिणाम आमच्या जेवणावरही झाला आहे. मी टोमॅटो कमी खायला लागलो आहे. मी सुपरस्टार असल्यामुळे माझ्यावर टोमॅटोच्या भाव वाढीचा परिणाम होणार नाही, असा जर तुमचा समज असेल तर ते खोटं आहे". 


उर्फी जावेदबद्दल जाणून घ्या... (Who is Urfi Javed)


उर्फी जावेद छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण सध्या सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या (Bigg Boss OTT) माध्यमातून उर्फीला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. बडे भैया की दुल्हनिया, चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, सात फेरो की हेरा फेरी, बेपनाह, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है अशा अनेक मालिकांमध्ये उर्फीने काम केलं आहे. आता उर्फी लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. 


संबंधित बातम्या


Urfi Javed : उर्फी जावेदचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' सिनेमात झळकणार