Urfi Javed New Look : आपल्या हटके फॅशन आणि भन्नाट ड्रेसिंगमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) कायमच चर्चेत असते. आता तिने रस्त्यात पडलेल्या सिगारेटच्या थोटक्यांचा वापर करून हटके ड्रेस बनवला आहे. उर्फी जावेदचा हा लूक (Urfi Javed New Look) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


उर्फी जावेद चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. 'बिग बॉस ओटीटी'नंतर (Bigg Boss OTT) उर्फीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लहानमुलांपासून सर्वच मंडळी उर्फीच्या अतरंगी फॅशन सेन्सचे फॅन्स आहेत. वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करत ती आपला लूक बनवत असते. 




उर्फीने आता तिच्या नव्या लूकचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या लूकमध्ये ती रस्त्यात पडलेले उरलेले सिगारेटचे तुकडे गोळा करताना दिसत आहे. या तुकड्यांचा वापर करत तिने खास ड्रेस बनवला आहे. 


उर्फीच्या व्हिडीओवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव


उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर पहिल्यांचा कोणीतरी सिगारेटचा सकारात्मक वापर केला, उर्फीचा ड्रेस पहिल्यांदा मला आवडला, या ड्रेसमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


उर्फी जावेद काही दिवसांपूर्वी खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. अभिनेत्री म्हणाली होती,"माझं तीन खोल्यांचं घर असून घरात असताना मी कधीच कपडे परिधान करत आहे. आधी मी भाड्याच्या घरात राहायचे. पण आता मी मोठं घर घेतलं असून माझ्या घरात विवस्त्र फिरायला मला आवडतं". 


उर्फी जावेदबद्दल जाणून घ्या... (Who is Urfi Javed)


उर्फी जावेद (Urfi Javed) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी हटके फॅशनमुळे ती जास्त चर्चेत आली आहे. उर्फीने 2016 मध्ये 'बडे भैय्या की दुल्हनिया' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयप्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कार्यक्रमात ती सहभागी झाली. 'बिग बॉस ओटीटी'देखील तिने गाजवला आहे. उर्फी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून नव्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. आता उर्फीच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Urfi Javed : उर्फी जावेदचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाली,"मी घरात कधीच कपडे..."