Urfi Javed: अभिनेत्री  जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी नुकत्याच मुंबईमध्ये पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. या फॅशन शोमधील जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन या काही फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसत आहेत. आता जया बच्चन (Urfi Javed) यांचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री उर्फी जावेदनं जया यांच्यावर टीका केली आहे. 


उर्फीची पोस्ट


जया बच्चन यांचा व्हिडीओ शेअर करुन उर्फीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी आशा करते की, तुम्ही दोन वेळा पुन्हा पडा, असं त्या म्हणाल्या? प्लिज यांच्यासारखं अजिबात होऊ नका. सगळ्यांची प्रगती व्हावी, असा विचार करावा. जे कॅमेऱ्याच्या मागे लोक आहेत आणि जे पुढे आहेत त्या सर्वांची प्रगती व्हावी.  तुम्ही वयानं मोठे आणि सामर्थ्यवान आहात, म्हणून लोक तुमचा आदर करत नाहीत. तर जेव्हा तुम्ही लोकांसोबत आदराने वागता तेव्हाच लोक तुमचा आदर करतील' 







व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जया बच्चन या फोटोग्राफर्सला म्हणतात, 'कोण आहात तुम्ही?' जया बच्चन यांच्या या प्रश्नाला फोटोग्राफर उत्तर देतो. त्यानंतर जया बच्चन म्हणातात, 'कोणत्या वृत्तपत्राकडून तुम्ही आला आहात?' व्हिडीओमध्ये नव्या ही जया बच्चन यांना फोटोग्राफर्सबद्दल सांगताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. जया बच्चन या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 


अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Jaya Bachchan:  'तुम्ही कोण आहात?'; फोटोग्राफर्सवर भडकल्या जया बच्चन, व्हिडीओ व्हायरल