Jaya Bachchan:  अभिनेत्री  जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी नुकत्याच मुंबईमध्ये पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये जया या त्यांच्या नातीसोबत म्हणजेच नव्या नवेली नंदासोबत (Navya Naveli Nanda) गेल्या होत्या. यावेळी अनेक फोटोग्राफर्स हे जया बच्चन आणि नव्या यांचे फोटो काढत होते. अशातच जया या फोटोग्राफर्सवर भडकल्या. नुकताच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसत आहेत. 


व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जया बच्चन या फोटोग्राफर्सला म्हणतात, 'कोण आहात तुम्ही?' जया बच्चन यांच्या या प्रश्नाला फोटोग्राफर उत्तर देतो. त्यानंतर जया बच्चन म्हणातात, 'कोणत्या वृत्तपत्राकडून तुम्ही आला आहात?' व्हिडीओमध्ये नव्या ही जया बच्चन यांना फोटोग्राफर्सबद्दल सांगताना दिसत आहे.   


व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.  एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'जया बच्चन या नेहमी चिडलेल्या का असतात?' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'फोटोग्राफर्सला असं बोलणं चुकीचं आहे.' अनेकांनी व्हिडीओला कमेंट करुन जया बच्चन यांना ट्रोल केलं आहे. 






जया बच्चन यांचा आगामी चित्रपट


जया बच्चन या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये जया यांच्यासोबत रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि धर्मेंद्र हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Happy Birthday Jaya Bachchan : रियलच नाही, तर रील लाईफमध्येही गाजली ‘जया-अमिताभ’ यांची जोडी!