Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अभिनयापेक्षा अतरंगी फॅशनमुळे जास्त चर्चेत असते. पण आता उर्फी जावेदला अटक झाल्याचं म्हटलं जात आहे. उर्फीला तोकडे कपडे घालणं महागात पडलं आहे. तोकडे कपडे घातल्याने पोलिसांनी उर्फीला ताब्यात घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्फीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.


उर्फी जावेदला पोलिसांनी घेतलं ताब्यात


उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी सकाळी-सकाळी एका कॉफी शॉपमध्ये बसलेली दिसत आहे. दरम्यान पोलीस अधिकारी तिला ताब्यात घेतात. उर्फीला त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात घेऊन जातात. त्यावेळी उर्फी त्यांना त्यामागचं कारण विचारते. त्यावर त्या पोलीस अधिकारी म्हणतात,"एवढे छोटे-छोटे कपडे परिधान करून कोण फिरतं?".






उर्फीचे चाहते चिंतेत  


उर्फीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाचा बॅकलेस टॉप आणि जीन्स परिधान केलेली दिसत आहे. उर्फीच्या या व्हिडीओवर चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींनी हा प्रँक असून ती मस्करी करतेय असं म्हटलं आहे. तर तिचे चाहते मात्र चिंता व्यक्त करत आहेत. उर्फी जावेदचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते हैराण झाले आहेत.  


उर्फीला मिळालेली जीवे मारण्याची धमकी


उर्फी जावेदला दोन दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. उर्फीने 'भूल भुलैया' सिनेमातील राजपाल यादवसारख्या पंडिताचा गेटअप करत एक व्हिडीओ शेअर केला. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने उर्फी जावेदला ईमेलच्या माध्यमातून धमकी दिली. व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले आणि तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर उर्फीने ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.


उर्फी जावेदबद्दल जाणून घ्या... (Who Is Urfi Javed)


आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत उर्फीचा समावेश आहे. 'मेरी दुर्गा' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांमध्ये उर्फीने काम केलं आहे. पण करण जोहरच्या (Karan Johar) 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमामुळे उर्फीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. 


संबंधित बातम्या


Urfi Javed : उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?