Urban Climate Film Festival: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स (NIUA) U20 एंगेजमेंट इव्हेंट्स अंतर्गत CITIIS कार्यक्रमाद्वारे पहिल्या अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलचे (Urban Climate Film Festival) आयोजन केले जात आहे. भारत सरकारचे गृहनिर्माण- शहरी व्यवहार मंत्रालय, फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (AFD) आणि युरोपियन युनियन यांच्या सहकार्याने हा फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. शहरांमधील लोकांच्या जीवनावर हवामान बदलाच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा फिल्म फेस्टिव्हल 24 ते 26 मार्च 2023 च्या दरम्यान दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 9 देशांमधील 11 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपट निर्मात्यांना 23 जानेवारी ते 13 मार्च दरम्यान चित्रपटांची नोंदणी करायची होती. चित्रपट निर्मात्यांना जगभरातील शहरांमधील बदलत्या वातावरणाचा जीवनावर कसा परिणाम होत आहे? हे दर्शवणाऱ्या चित्रपट सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये 20 हून अधिक देशांमधून 150 चित्रपट दाखवण्यात आले. यामधील निवड झालेले चित्रपट पुढील काही महिन्यांत नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबाद येथील महोत्सवात दाखवले जातील.
कोण आहेत ज्युरी?
डॉ सुरभी दहिया (प्राध्यापक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन), डॉ प्रणव पातर (मुख्य कार्यकारी, ग्लोबल फाऊंडेशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ एन्व्हायर्नमेंट), श्री सब्यसाची भारती (उपसंचालक, सीएमएस वातावरण) हे अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलचे ज्युरी आहेत. त्यांनी अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलमधील चित्रपटांची निवड केली.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्सचे संचालक हितेश वैद्य यांनी अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलबद्दल सांगितलं, 'माझा विश्वास आहे की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल महत्त्वाचे मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलमधील चित्रपट हे एक शक्तिशाली माध्यम आहे. शहरी वातावरणावरील विविध चित्रपटांचे प्रदर्शन करून, अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हल अनेकांसाठी नक्कीच लक्षवेधी ठरेल.' नवी दिल्ली येथील एम.एल. भरतीया ऑडिटोरियम येथे 24 मार्च रोजी अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात होईल.
अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वांना फ्री एन्ट्री आहे. जर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये एन्ट्री हवी असेल तर ऑनलाइन पद्धतीनं प्रेक्षक रजिस्ट्रेशन करु शकतात. https://niua.in/citiis/urban-climate-film-festival# या वेब साइटवर प्रेक्षक रजिस्ट्रेशन करु शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :