Shah Rukh Khan: 'पठाण' (Pathaan) या बिग बजेट चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 2023 या वर्षाची सुरुवात पठाण या चित्रपटानं दणक्यात केली. अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. या चित्रपटामधील गाणी देखील हिट ठरली. अनेक नेटकऱ्यांनी पठाण चित्रपटामधील गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर केले. नुकताच माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनं (Irfan Pathan) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इरफानचा मुलगा हा पठाण चित्रपटामधील गाण्यावर थिरकताना दिसत आहे.


इरफाननं शेअर केला व्हिडीओ


इरफान पठाणनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचा मुलगा हा झुमे जो पठाण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला इरफाननं कॅप्शन दिलं, 'खान सहाब... प्लिज तुमच्या लिस्टमध्ये हा क्युटेस्ट फॅनचे नाव अॅड करा.' इरफाननं शेअर केलेल्या या व्हिडीओवर शाहरुखनं कमेंट केली आहे. 


शाहरुखची कमेंट


इरफाननं शेअर केलेल्या त्याच्या मुलाच्या व्हिडीओला शाहरुख खाननं कमेंट केली, 'हा तुझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आहे... छोटा पठाण' शाहरुखननं केलेल्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. 


पाहा व्हिडीओ: 






'पठाण' मधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती


पठाण चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील 'झुमे जो पठाण' आणि 'बेशरम रंग' या दोन गाण्यांवरील रील्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


पठाणची तगडी स्टार कास्ट 


पठाण या चित्रपटात शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अभिनेता सलमान खानने या चित्रपटात कॅमिओ केला आहे. 25 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. 


'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट 


ओटीटी प्लॅटफॉर्मवर पठाण हा चित्रपट रिलीज झाला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pathaan: प्रतीक्षा संपली! शाहरुखचा 'पठाण' घरबसल्या पाहता येणार; कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या...