Upendra Limaye On Animal 2 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. तसेच या सिनेमाचा दुसरा भागदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीक्वेलमध्येही मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


फ्रेडी पाटील पुन्हा गाजवणार रुपेरी पडदा!


'अ‍ॅनिमल' हा सिनेमा रिलीजआधीपासून चर्चेत आहे. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 'अ‍ॅनिमल' या सिनेमात मराठमोळी अभिनेता उपेंद्र लिमये महत्त्वाच्या भूमिकेत होता. फ्रेडी पाटील (Freddy Patil)  या भूमिकेत तो दिसून आला होता. त्याची भूमिका छोटी असली तरी त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. आता 'अ‍ॅनिमल'च्या सीक्वेलमध्येही तो फ्रेडी पाटीलच्या भूमिकेत दिसून येणार आहे.


'अ‍ॅनिमल'च्या सीक्वेलचं नाव 'अ‍ॅनिमल पार्क' (Animal Park) असं आहे. 'अ‍ॅनिमल' सुपरहिट झाल्यानंतर चाहते आता 'अ‍ॅनिमल पार्क'ची प्रतीक्षा करत आहेत. तृप्ती डिमरीदेखील 'अ‍ॅनिमल पार्क'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. प्रभासच्या (Prabhas) 'सालार' (Salaar) या सिनेमानंतर 'अ‍ॅनिमल पार्क'च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 2026 मध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होईल.


'अ‍ॅनिमल पार्क'मध्ये रणबीर कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. रणबीर आणि रणविजयसह अजीज हकदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीक्वेलची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'अ‍ॅनिमल'प्रमाणे 'अ‍ॅनिमल पार्क'देखील बॉक्स ऑफिस गाजवणार आहे.


उपेंद्र लिमयेंचा सिनेप्रवास... (Upendra Limaye Movies)


उपेंद्र लिमये हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. 'अ‍ॅनिमल' या सिनेमात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले. त्यांनी साकारलेली फ्रेडी पाटीलची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. भूमिका छोटी असली तरी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. उपेंद्रने 1994 मध्ये 'मुक्ता' या सिनेमाच्या माध्यमातून आपला अभिनयप्रवास सुरू केला. उपेंद्र यांनी मराठी मनोरंजनसृष्टीतील एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. तसेच 'चांदनी बार', 'पेज 3', 'शिवा', 'ट्रॅफिक सिग्नल' आणि 'सरकार' यांसारख्या हिंदी सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. 'जोगवा' या सिनेमासाठी उपेंद्र लिमयेंना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. उपेंद्र लिमये यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या 


Upendra Limaye: 'अॅनिमल' मध्ये काही मिनिटांचा सीन, तरीही भाव खाऊन गेला; अशी मिळाली उपेंद्र लिमयेला चित्रपटाची ऑफर