Mumbai : आता कारागृहातदेखील महिला कैद्यांचं मनोरंजन होणार आहे. भायखळा तुरुंगाने (Byculla Jail) आयोजित केलेल्या विशेष उपक्रमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महिला कैद्यांच्या मनोरंजनासाठी 'FM रेडीओ सेंटर'ची स्थापना करण्यात आली आहे. भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहाने विशेष उपक्रम आयोजित केला आहे.
भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहामध्ये पुरूष व महिला कैद्यांच्या मनोरंजनाकरीता 'FM रेडीओ सेंटर' हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. FM रेडीओ सेंटरमध्ये कारागृहातील महीला कैदी श्रध्दा चौगुले यांनी FM सेंटर मध्ये रेडिओ जॉकीची भूमिका पार पाडली आहे. यावेळी श्रध्दा चौगुले यांनीच अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य यांची रेडिओ FM वर मुलाखत घेऊन कारागृह विभागातील सुधारणा व सोईसुविधेबाबत चर्चा केली.
अमिताभ गुप्ता यांनी एफएम सेंटरवरुन कारागृहातील कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कैद्यांना देण्यात आलेल्या सोईसुविधा व यापुढे देण्यात येणाऱ्या सोईसुविधेबाबत चर्चा करुन मार्गदर्शन केले. तसेच विदेशी कैद्यांसोबत चर्चा केली असता विदेशी कैद्यांनी कारागृहात ई-मुलाखत व इतर सोईसुविधा सुरु केल्याबददल कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले.
'FM रेडीओ सेंटर' का स्थापन करण्यात आले?
कारागृहामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यातील कैदी असतात. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंदीच्या मनात नेहमी अस्वस्थता असते. आपलं कुटुंब, आपले भविष्य, आपली केस याबाबत नेहमीच प्रत्येक कैद्याला चिंता असते. त्यांच्या विचारामुळे प्रत्येक कैद्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. यातून थोडासा विरंगुळा म्हणून व कैद्यांना सकारात्मतेकडे नेण्याकरीता कारागृहात FM रेडिओ सेंटर हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
भायखळाआधी नागपूर आणि पुणे कारागृहातदेखील एफएम रेडिओ सेटंरची स्थापना करण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये, हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवत 'FM रेडीओ सेंटर'ची स्थापना करण्यात आली आहे.
अनोख्या अंगणवाडीने वेधलं लक्ष
'FM रेडीओ सेंटर'सह भायखळा तुरुंगात एक अनोखी अंगणवाडीदेखील सुरू आहे. तुरुंगातील कर्मचाऱ्यांसोबत कैद्यांची मुलेदेखील या अंगणवाडीत शिकतात. त्यामुळे भायखळा तुरुंगात बालकांच्या हसण्या-खेळण्याचा आवाज घुमतो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ही अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या