Upcoming OTT Releases: ऑक्टोबरच्या मीड विकमध्ये इंग्रजी, कोरियन, हिंदी, बंगाली, दाक्षिणात्य भाषांमधील अनेक शो आणि चित्रपटांची मेजवाणी प्रेक्षकांना मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हीही वेगळा कंटेट पाहण्याचा विचार करत असाल, तर ओटीटीवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज (Web Series) तुमची वाट पाहत आहेत.
ॲक्शन, ड्रामा, रोमान्स आणि थ्रिलनं भरलेला भरपूर कंटेंट या आठवड्यात OTT वर रिलीज केला जाईल. विशेषत: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून मनोरंजनाचा मसाला मिळणार आहे. तर या आठवड्याच्या दर्जेदार सीरिजच्या यादीमध्ये कोणते वेब शो आणि चित्रपट समाविष्ट आहेत, हे सविस्तर जाणून घेऊयात...
रिता सन्याल (Reeta Sanyal)
अभिनेत्री अदा शर्माची 'रीता सन्याल' ही नवी सीरिज या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. हा एक इन्वेस्टिगेटिव्ह कॉमेडी ड्रामा आहे, ज्यामध्ये अदा शर्मा एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
रिलीज डेट : 14 ऑक्टोबरकुठे पाहाल : डिझ्ने हॉटस्टार (Disney+ Hotstar)
द लिन्क्लिन लॉयर- सीजन 3 (The Lincoln Lawyer: Season 3 )
द लिन्क्लिन लॉयर- सीजन 3... हा प्रसिद्ध कोर्टरूम ड्रामा आहे. तिसऱ्या सीझनमध्ये दाखवलं जाईल की, मिकी प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमध्येही अनेक कठीण प्रसंगांचा सामना करणार आहे. शोमध्ये दाखवलं जाईल की, मिकीच्या आयुष्यात खरा भूकंप तेव्हा येतो, ज्यावेळी त्याची एक्स वाईफ मॅगी परत येते.
रिलीज डेट: 17 ऑक्टोबरकुठे पाहाल: नेटफ्लिक्स (Netflix)
आऊटसाईड (Outside)
ही एक सायकॉलॉजिकल हॉरर फिल्म आहे, ज्यामध्ये दाखवण्यात आलं आहे की, एका कुटुंबावर काही झॉम्बी अटॅक करतात. त्यानंतर ते एका अशा फार्महाऊसमध्ये जातात, जिथे त्यांची झॉम्बीपासून सुटका होईल, असं त्यांना वाटतं. पण असं अजिबात होत नाही. पुढे काय घडतं? ते तुम्हीच पाहा...
रिलीज डेट : 17 ऑक्टोबरकुठे पाहाल: नेटफ्लिक्स (Netflix)
फॅबुलस लाइव्स वर्सेज बॉलिवूड वाइव्स (Watch Fabulous Lives of Bollywood Wives)
कॅमेऱ्यापासून दूर राहणाऱ्या बॉलिवूड स्टार पत्नीचं आयुष्य कसं असतं? याची झलक देणाऱ्या 'फॅब्युलस लाइव्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्ज' या शोचा तिसरा सीझन या आठवड्यात सुरू होणार आहे. या सीझनमध्ये रिद्धिमा कपूर साहनी, कल्याणी साहा चावला आणि शालिनी पासी यांचाही समावेश असेल.
रिलीज डेट: 18 ऑक्टोबर कुठे पाहाल: नेटफ्लिक्स (Netflix)
स्नेक्स अँड लँडर (Snakes and Ladders)
'स्नेक्स अँड लँडर' तमिल वेब सीरीज आहे, जिचा जॉनर कॉमेडी आहे. त्याची कथा अशा मित्रांवर आधारित आहे, जे अचानक एका संकटात अडकतात. तिथून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे, इच्छा नसतानाही त्यांना सर्व अडचणींचा सामना करावा लागेल. जसजसा तो प्रगती करतो, तसतसा तो स्वतःबद्दल अधिक शिकतो.
रिलीज डेट : 18 ऑक्टोबर कुठे पाहाल: अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ
महत्त्वाच्या इतर बातम्या :
