Upcoming OTT Release of April : ओटीटीवर (OTT) कधी, काय रिलीज होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. ओटीटी प्रेमींसाठी 'एप्रिल 2024' (April 2024) खूपच खास असणार आहे. या महिन्यात नेटफ्लिक्स (Netflix), प्राईम व्हिडीओ (Prime Video), झी 5 (Zee 5) अशा वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चांगले चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होणार आहेत. परिणीती चोप्राच्या (Parineeti Chopra) चमकीलापासून सलमान खानची (Salman Khan) भाची अलिजेंहच्या 'फर्रे'पर्यंत अनेक सिनेमांचा आणि वेबसीरिजचा यात समावेश आहे. हे दर्जेदार चित्रपट आणि वेबसीरिज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता जाणून घ्या..य


क्रुक्स (Crooks)
कधी रिलीज होणार? 4 एप्रिल
कुठे पाहाल? नेटफ्लिक्स


'क्रुक्स' हा सिनेमा 4 एप्रिलला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यूरोपच्या दुश्मन गँगवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.


अमर सिंह चमकीला (Amar Singh Chamkila)
कधी रिलीज होणार? 12 एप्रिल
कुठे पाहाला? नेटफ्लिक्स


दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचा 'अमर सिंह चमकीला' हा चित्रपट 12 एप्रिल 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. इम्तियाज अली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अमर सिंह चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.


पैरासाइट द ग्रे (Parasyte : The Grey)
कधी रिलीज होणार? 5 एप्रिल
कुठे पाहाल? नेटफ्लिक्स


अज्ञान पैरासाइट हिंसक पद्धतीने मानसावर कसं राज्य करतात हे 'पैसासाइट द ग्रे' या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. 5 एप्रिल 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.


हनुमान (Hanuman)
कधी रिलीज होणार? 5 एप्रिल
कुठे पाहाल? झी 5, जिओ सिनेमा


दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जाच्या 'हनुमान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. 40 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 200 कोटींपेक्षा अधिक कमाई करत इतिहास रचला आहे. 5 एप्रिल 2024 रोजी हा सिनेमा झी 5, जिओ सिनेमावर पाहू शकता. कन्नड, मल्याळम आणि तामिळमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल. 


फर्रे
कधी रिलीज होणार? 5 एप्रिल
कुठे पाहता येईल? झी 5


सलमान खानची भाची अलीजेब अग्निहोत्रीने 'फर्रे' या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. हा सिनेमा 5 एप्रिलला प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 'फर्रे' या सिनेमात एज्युकेशन सिस्टमची गोष्ट दाखवण्यात आली आहे.


विश (Wish)


विश हा अॅनिमेटेड चित्रपट 3 एप्रिल 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


ब्लड फ्री (Blood Free)


थरार, नाट्य आणि मनोरंजनात्मक असणारा 'ब्लड फ्री' हा हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


अदृश्यम 
कधी रिलीज होणार? 11 एप्रिल 
कुठे पाहता येईल? सोनी लिव्ह


संंबंधित बातम्या


Airtel Xstream Fiber : एअरटेल एक्सस्ट्रिम फायबर बनेल तुमच्या स्मार्ट टीव्हीचा बेस्ट फ्रेन्ड, ही आहेत कारणे