Kapil Sharma On Politics : 'लोकसभा निवडणूक 2024'चा (Lok Sabha Election 2024) सर्वत्र माहोल आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut), अरुण गोविलसह (Arun Govil) अनेक कलाकार 'लोकसभा निवडणूक 2024' लढवणार आहेत. अशातच आता विनोदवीर कपिल शर्मा (Kapil Sharma) राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे. विनोदवीराने नुकतच याबद्दल भाष्य केलं आहे. कपिल शर्मा सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) या कार्यक्रमाचं प्रमोशन करत आहे. या कार्यक्रमाच्या प्रमोशननिमित्ताने त्याने 'आपकी अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी रजत शर्माने त्याला (Rajat Sharma) राजकारणाबद्दल प्रश्न विचारला. दरम्यान कपिल मजेशीर अंदाजात उत्तर देताना दिसून आला. 


कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? (Kapil Sharma on Joining Politics)


कपिल शर्माला रजत शर्माने प्रश्न विचारला की,"अनेक विनोदवीरांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. तुम्हीदेखील राजकारणात एन्ट्री करण्याचा विचार करत आहात का?". याचं उत्तर देत कपिल शर्मा म्हणाला,"मला असं वाटतं की राजकारणात एन्ट्री केल्यानंतर ती व्यक्ती अधिक सीरियस होते. का ते माहिती नाही. मला मस्ती-मजा करत आयुष्य जगायला आवडतं. राजकारणी झाल्यानंतर सीरियस व्हावं लागतं. मी कधीही सीरियस व्यक्ती होऊ शकत नाही. मी जे करतोय त्यात आनंदी आहे. बाकी वेळेचं काही सांगता येत नाही". 




कपिल शर्मा कमबॅकसाठी सज्ज


कपिल शर्माने 2013 मध्ये 'कॉमेथी विथ कपिल' या कार्यक्रमाची सुरुवात केली, कलर्स चॅनलवर या कार्यक्रमाचं प्रसारण होत असे. त्यानंतर 'द कपिल शर्मा शो' हा त्याचा कार्यक्रम सोनी चॅनलवर सुरू झाला. अनेक वर्ष छोट्या पडद्यावर हा कार्यक्रम सुरू होता. आता नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे. 30 मार्च रात्री 8 वाजता नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना 'द ग्रेट इंडियन कपिल शो' पाहता येणार आहे.


'द ग्रेट इंडियन कपिल शो' कपिल शर्मा होस्ट करणार आहे. तर अर्चना पूरन सिंह परिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. तसेच सात वर्षांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुनील ग्रोवर कमबॅक करणार आहेत. सुनील ग्रोवरसह कृष्णा अभिषेक, कीकू शारदा आणि राजीव ठाकुर या कार्यक्रमाचा भाग असणार आहेत. 


कपिल शर्माबद्दल जाणून घ्या... (Who is Kapil Sharma)


कपिल शर्माचा जन्म 2 एप्रिल 1981 रोजी पंजाबमधील अमृतमध्ये एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात झाला आहे. कपिलच्या आईचं नाव जितेंद्र कुमार आहे. त्याच्या वडिलांचे 2004 मध्ये निधन झाले. कपिल शर्मा गर्लफ्रेंड गिन्नी चनरथसोबत 2018 मध्ये लग्नबंधनात अडकला. कपिल शर्मा आज सर्वात महागडा विनोदवीर आहे. मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. कपिल शर्माची एकूण संपत्ती 330 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 'किस किसको प्यार करू' या 2015 मध्ये आलेल्या सिनेमाच्या माध्यमातून कपिलने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. पहिलाच सिनेमा त्याचा सुपरहिट ठरला होता. आता त्याचा 'क्रू' (Crew) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.