Jitendra Awhad : 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची (69 National Film Awards) घोषणा झाली आहे. एकीकडे पुरस्कार जाहीर झालेल्या कलाकृतींचं कौतुक होत आहे तर दुसरीकडे मात्र ज्या कलाकृतींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याच्यापेक्षा चांगल्या कलाकृती असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीदेखील ट्वीट करत ही खंत व्यक्त केली आहे.


जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट काय आहे? 


जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलं आहे,"राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभ पार पडला. कोण कुठली माणसं निवड समितीमध्ये होती ते माहीत नाही. पण त्यांना 'कश्मीर फाइल्स' (The kashmir Files) या सिनेमाला पारितोषिक द्यावंसं वाटलं. पण 'जय भीम' या सिनेमाचा त्या निवड समितीमधील सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतोय. खरंतर लोकांच्या मनातील या वर्षातील सिनेमा 'जय भीम' (Jai Bhim) हाच होता. लोकांच्या मनातील पारितोषिक हे 'जय भीम' सिनेमालाच".






जितेंद्र जोशी यांच्या ट्वीटवर 'जय भीम'ला राष्ट्रीय पुरस्कार नाही मिळाला तर काय? जगाने या सिनेमाला प्रेमाचा पुरस्कार दिला आहे. सहमत आहे.. दोन्ही सिनेमांत जय भीम चांगला आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहे. 'जय भीम' या सिनेमात एकही पुरस्कार घोषित न झाल्याने जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आपली खंत व्यक्त केली आहे. 


जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) आणि 'जय भीम' (Jai Bhim) हे दोन्ही सिनेमे सामाजिक विषयांवर आधारित आहेत. 


'जय भीम' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Jai Bhim Movie Details) 


'जय भीम' हा तामिळ सिनेमा आहे. टीजे ज्ञानवेल यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सूर्या (Suriya), लिजोमोल जोस, के.मणिकंदन, राजिशा विजयन, प्रकाश राज, राव रमेश या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 1993 मधील एका सत्य घटनेवर आधारित आहेत. समाजातील भीषण वास्तव या सिनेमात दाखवण्यात आले आहे. जीवघेणा अत्याचार, अत्याचाराच्या विरुद्धचा संविधानिक चौकटीतील संघर्ष, न्याय मिळवणं अशा अनेक गोष्टी सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत. 


'द कश्मीर फाइल्स' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (The Kashmir Files Movie Details)


विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराचे चित्रण करण्यात आले होते. अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाचे अनेक नेत्यांनी खास शो आयोजित केले होते. एकीकडे या सिनेमावर टीका होत असताना कलाकारांच्या अभिनयाचं मात्र कौतुक होत आहे.


संबंधित बातम्या


National Film Awards 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि कृती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; पाहा विजेत्यांची यादी