Uorfi Javed :   उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या विचित्र कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. याआधी तिच्यावर बरीच टीका देखील झाली होती. पण आता तिचाच ड्रेसिंग सेन्स अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता उर्फीने नुकतच तिचा एक ड्रेस विकणार असल्याची माहिती तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. पण या ड्रेसची किंमत ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला असल्याच चित्र सध्या आहे. 


उर्फी जावेदने शनिवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या ब्लॅक गाऊनचे फोटो शेअर केले होते. त्यावर तिने सांगितलं की, फुलपाखरं आणि पानं असलेला हा ड्रेस मी 3.66 कोटी रुपयांना विकत आहे. तिने तिच्या या ड्रेसचा फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की, 'मी माझा बटरफ्लाय ड्रेस विकण्याचा निर्णय घेतला आहे, जो सर्वांना खूप आवडला. किंमत- 3,66,90000 रुपये फक्त. कोणीही ते विकत घेण्यास इच्छुक असल्यास त्याला DM करू शकता.'


सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस


उर्फीची ही पोस्ट पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावर एका युजरने कमेंट करत म्हटटलं की, माझ्याकडे फक्त 50 रुपये आहेत, नाहीतर मी हा ड्रेस घेतला असता... आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, हा ड्रेस  EMI वर मिळेल का?  मी लाडूंवर व्याज देऊ शकतो. यावर आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, हा ड्रेस डायमंडचा आहे का? ज्याची किंमत 3 कोटी रुपये आहे. यावर उर्फीच्याच बहिणीने यावर कमेंट करत म्हटलं की,मी विकत घेतला असता पण माझ्याकडे एक डॉलर कमी आहे....  


उर्फी बिग बॉस ओटीटीमुळे चर्चेत


उर्फीने तिच्या करिअरची सुरुवात मालिकेतून केली. मेरी दुर्गा, सात फेरो की हेरा फेरी, कसौटी जिंदगी की आणि इतर अनेक मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाल्यानंतर उर्फी प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या फॅशन सेन्समुळे ती चर्चेत असते. तिच्या पोस्टवर अनेकदा तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. पण याचा उर्फीवर कधीच कोणता परिणाम होत नाही आणि ती प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी तिच्या विचित्र आऊटफिटमध्ये दिसते.  






ही बातमी वाचा : 


Marathi Serial : अधितपीकडूनच अक्षराचा सर्वात मोठा विश्वासघात, भुवनेश्वरीच्या प्लॅनमध्ये सहभाग; आता नेमकं कोणतं वळण येणार?