मुंबई : सध्या देशभर सर्वत्र केवळ रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोणच्या लग्नाचीच चर्चा आहे. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यांच्या लग्नाचा एकही फोटो लीक होणार नाही, याची काळजी या कपलने घेतली आहे. त्यामुळे या कपलच्या लग्नाचे फोटो कधी पहायला मिळतील, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनादेखील या कपलच्या लग्नाचे फोटो पाहण्याची उत्सुकता लागली आहे. त्यांची उत्सुकता दर्शवणारी एक मिश्कील इन्स्टाग्राम पोस्ट इराणी यांनी केली आहे.
इराणी यांनी केलेली इन्स्टाग्राम पोस्ट पाहुन सर्वांनाच हसू येईल. त्या पोस्टमध्ये एक मानवी हाडांचा सापळा एका बाकावर वाट पाहत बसला असल्याचे पहायला मिळत आहे. त्या फोटोवरील कॅप्शनमध्ये इराणी यांनी म्हटले आहे की, "जेव्हा तुम्ही रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंची खूप वेळापासून वाट पाहत असता, तेव्हा..."
दीप-वीरचे व्हायरल झालेले फोटो