Viral Photo: बॉलिवूड कलाकारांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. 'आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसत असतील?', असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुकताच एका बॉलिवूड अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमधील अभिनेत्रीच्या क्यूटनेसने अनेकांचे लक्ष वेधले. या अभिनेत्रीला अनेकांनी ओळखलं देखील नाही.   


Saif Ali Khan and Amrita Singh Divorce : ...म्हणून माझा आणि अमृताचा घटस्फोट झाला; सैफ अली खानचा खुलासा


कतरिना कॅफच्या बलपणीचा फोटो व्हायरल 
फोटोमधील छोटी मुलगी कतरिना कॅफ आहे. या फोटोमधील कतरिनाच्या क्यूट स्माइलने अनेकांचे लक्ष वेधले.  बॉलिवूडमधील अनेक कलकरांनी या फोटोवर कमेंट करत पसंती दिली.  कतरिना तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.  कतरिनाचे सोशल मीडियावर 5 कोटीपेक्षा जास्त फोलोवर्स आहेत. तिचे चाहते सोशल मीडियावरील तिच्या  पोस्टची उत्सुकतेने वाट पाहात असतात. कतरिना कधी मॉडर्न तर कधी पारंपरिक लूकमधील फोटो शेअर करते.  


Bigg Boss Marathi 3 : 'इच्छा माझी पुरी करा'च्या टास्कनंतर आज घरात रंगणार 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' चा टास्क


कतरिना कॅफच्या आगामी चित्रपटांबद्दल प्रेक्षक उत्सुक 
कतरिनाच्या 'सूर्यवंशी' या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटामध्ये कतरिनासोबत अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. जब तक है जैन, टायगर जिंदा है, जिंदगी मिलेगी ना दोबारा, वेलकम आणि एक था टायगर या सुपर हिट चित्रपटांमध्ये कतरिनाने काम केले आहे.


Tiger Shroff : 'टायगर श्रॉफ'ने 'पर्यावरण संवर्धन' आणि 'वृक्षारोपणा'चे केले आवाहन


कतरिनासोबतच अभिनेत्री सोनम कपूरचा देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून सोनमने कॅप्शन दिले होते, 'तेव्हा मी क्यूट मुलगी होते.'