Kriti Sanon on Bollywood : अभिनेत्री क्रिती सेननची (Kriti Sanon) मुख्य भूमिका असलेला 'क्रू' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमामध्ये करीना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि तब्बूसोबत (Tabbu) ती झळकली आहे. या सिनेमाच्या काही दिवसांपूर्वीच क्रितीचा शाहिद कपूरसोबत 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये आला होता. तिचा हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. 


क्रितीने आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या आहेत. पण सध्या ही अभिनेत्री तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. क्रितीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या मनातली खंत व्यक्त केलीये. यावेळी तिने बॉलीवूडमध्ये कुणी कधीचा कुणाला सपोर्ट करत नाही, असं म्हटलं.


बॉलीवूडमध्ये अजिबात एकोपा नाही - क्रिती सेनन


एका मुलाखतीदरम्यान क्रितीने म्हटलं की, बॉलीवूडमध्ये गोष्टी आधीपेक्षा बऱ्या आहेत, पण त्या चांगल्या होण्याची गरज आहे. जर आपण एकमेकांना सपोर्ट करुन लागलो तर आपण नक्कीच काहीतरी वेगळं करु शकतो. एकमेकांचं कौतुक करणंही गरजेचं असतं. पण मला इथे ते काहीच दिसत नाही. मला तर याची पण शंका आहे की कुणी जर खरच चांगला परफॉर्मन्स करत असेल तर लोक त्याच्यासाठी खरंच आनंदीत होत असतील की नाही.


मी खरच खूप वाईट कमेंट्स ऐकल्या आहेत - क्रिती सेनन


अनेकदा चित्रपट फ्लॉप गेल्यावर अभिनेत्रीला ब्लेम केलं जातं या प्रश्नाचं उत्तर देताना क्रितीनं म्हटलं की, मी खरच खूप वाईटही कमेंट्स ऐकल्या आहेत. पण चित्रपट फ्लॉप होणं हे एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण टीमवर अवलंबून असतं. याचा संपूर्ण दोष फक्त महिलांना दिला जातो. हे फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर इतर क्षेत्रातही आहे. 


क्रिती सेननच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच दोन चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर ती काजोलसोबत 'दो पत्ती' या चित्रपटातही दिसणार आहे.  हा चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. काजोलशिवाय शाहीर शेखही मुख्य भूमिकेत असणार आहे. 






ही बातमी वाचा : 


Umesh Kamat : 'आज तिला सगळ्यात जास्त मिस करतो', उमेश कामतने शेअर केल्या आईच्या खास आठवणी