Tuntun Birth Anniversary : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला विनोदी अभिनेत्री टुनटुन (Tuntun Birth Anniversary) यांची आज (11 जुलै) 99वी जयंती आहे. टुनटुन यांनी आपल्या करिअरची सुरुवात गायिका म्हणून केली होती. टुनटुन यांचे खरे नाव उमा देवी असे होते. पुढे त्यांनी अभिनय विश्वात प्रवेश केला आणि पहिल्या महिल्या कॉमेडीयन टुनटुन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला होता. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या संघर्षमयी जीवनाबद्दल...
टुनटुन यांचा जन्म 11 जुलै 1923 रोजी अमरोहा येथे झाला. त्या अवघ्या अडीच वर्षांच्या असताना जमीन ताब्यात घेण्यासाठी टुनटुन यांच्या आई-वडिलांची हत्या करण्यात आली होती. यानंतर कुटुंबात त्या आणि त्यांचा भाऊ असे अवघे दोनच लोक एकमेकांचा सांभाळ करत जगत होते. मात्र, 9 वर्षांचा असताना त्याचीही हत्या करण्यात आली आणि टुनटुन पोरक्या झाल्या.
नातेवाइकांनीही केला छळ
अनाथ टुनटुन यांना काही काळ नातेवाईकांचा आसरा घ्यावा लागला. मात्र, हे नातेवाईक टुनटुन यांना घरातील सर्व कामे करायला लावायचे आणि दोन वेळच्या जेवणासाठी देखील त्यांना नोकरांसारखी वागणूक द्यायचे. हे सगळं सहन करत टुनटुन आयुष्याचा गाडा हाकत होत्या. एके दिवशी एक्साईज ड्युटी ऑफिसर अख्तर अब्बास काझी यांच्याशी टुनटुन यांची भेट झाली. पुढे या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले, पण फाळणी दरम्यान अख्तर अब्बास काझी पाकिस्तानात निघून गेले आणि पुन्हा एकदा टुनटुन एकट्या पडल्या.
अशी झाली गायन कारकिर्दीची सुरुवात!
टुनटुनच्या गरिबीत आयुष्य जगत होत्या. एके दिवशी अस्वस्थ होऊन टुनटुन सर्व काही सोडून मुंबईला पळून आल्या. इथे देखील त्यांना कोणाचाच आधार नव्हता, म्हणून त्या थेट संगीतकार नौशाद यांच्या घरी गेल्या आणि आपल्याला गाण्याची संधी देण्याची विनंती करू लागली. आपली मागणी मान्य न केल्यास समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी त्यांना दिली. नौशाद त्यांना गाण्याची संधी दिली आणि इथूनच त्यांच्या गायनाची कारकीर्द सुरू झाली.
अभिनय विश्वही गाजवले!
त्यांचे पहिलेच गाणे खूप हिट झाले, त्यानंतर त्यांनी 40 ते 45 गाणी गायली. मनोरंजन विश्वात जेव्हा नवी गाणी मिळणे बंद झाले, तेव्हा नौशाद यांच्याच सांगण्यावरून त्यांनी अभिनय सुरू केला.दिलीप कुमार अभिनीत ‘बाबुल’ त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे नाव टुनटुन होते, जे त्यांना इतके आवडले की त्यांचे नाव उमा देवी वरून बदलून टुनटुन करण्यात आले. त्यांनी दीर्घकाळ मनोरंजन विश्वात काम केले होते.
हेही वाचा :
Sai Pallavi: 'या' कारणामुळे बालपणी खाल्ला होता मार; साई पल्लवीनं सांगितला मजेशीर किस्सा