Sheezan Khan Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानचा (Sheezan Khan) जामीन अर्ज आज वसई न्यायालयाने फेटाळला आहे. जामीनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं शिझानच्या वकिलांनी सांगितलं. तर तुनिषाच्या आत्महत्येला न्याय देण्याच्या प्रक्रीयेचा पहिला विजय असल्याचं कुटुंब आणि वकिलांने सांगितलं आहे.
तुनीषा आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानचा जामीन अर्ज आज वसई न्यायालयानं फेटाळला आहे. शिझान खानच्या जामीन अर्जावर शनिवारी 7 जानेवारी, सोमवारी 9 जानेवारी आणि बुधवार 11 जानेवारीला दोन्ही पक्षांनी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली होती. त्यावर आज वसई सत्र न्यायालयानं शिझानचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
शिझानच्या आईने तुनिषाला जी औषध दिली होती. त्यावर तुनिषाच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला होता. ती औषधं कोणती होती. त्यानंतरच तिची मानसिक स्थिती बिघाडल्याचा आरोप केला गेला. तसेच तुनिषाच्या अंकाउंटमधून काही रक्कम ही काढल्या गेल्यात. त्या कुणाकडे गेल्या आहेत. यावर तपास करण्याचा मुद्दा न्यायालयाने ग्राह्य धरला. तर 15 डिसेंबरला शिझान आणि तुनिषाचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर दोघांचे संबंध तुटले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुनिषाला पॅनिक अटॅक आला होता.
तुनिषाने आत्महत्या करण्या अगोदर तिला भेटणारा आणि तिच्या सोबत बोलणारा हा शिझानच आहे. तुनिषा शिझानच्या रुम मध्ये होती. त्यांचं 45 मिनिटाचं संभाषण महत्त्वाचं आहे. शिझानने कबुल केलंय की, ब्रेकअप नंतर तुनिषा मानसिक तनावात होती. त्यामुळे शिझानला जामीन मिळाला तर तो केस प्रभावित करू शकतो. हा मुद्दा न्यायलयान ग्राह्य धरुन जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच शिझानच्या आई विरोधात मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केल्याचंदेखील तुनिषाच्या वकिलांनी सांगितलं आहे.
हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे.
संबंधित बातम्या