Sheezan Khan Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या (Sheezan Khan) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिझान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. पण त्याला आजही जामीन मिळालेला नाही.
शिझान खानच्या वकिलांनी 9 जानेवारीला बाजू मांडली होती. त्यानंतर आज फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. यावर आज दोन्ही पक्षाच्या वकिलांनी दिड तास युक्तीवाद केला. दोन्ही वकिलांची बाजू ऐकल्यावर न्यायलयानं 13 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती दिली.
आज कोर्टात शिजानचे कुटुंब आणि तुनिषाची आई मामा ही हजर होते. यावेळी तुनिषाच्या आईने न्यायालयातच रडणं सुरु करुन, शिजान आणि शिजानच्या वकिलांनावर दोषारोप केले. न्यायालयाने तुनिषाच्या आईला कोर्टाबाहेर काढले.
शिजानच्या वकिलांनी तुनिषाच्या वकिलांवर कोर्टात वेगळी भूमिका आणि मीडिया समोर वेगळी भूमिका मांडत असल्याचा आरोप केला. तसेच 13 जानेवारी 2023 रोजी शिझानला जामीन मिळणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच चौकशीची मागणीदेखील केली.
तुनिषा शर्माचे वकिल म्हणाले,"अलिबाबा... दास्तान - ए-काबुल' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान तुनिषा आणि तिच्या आईच्या नात्यात दुरावा येत होता. शिझानच्या कुटुंबियांनीच तुनिषाला तिच्या कुटुंबियांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता".
तुनिषा शर्मा डिप्रेशनमध्ये नव्हती
वकील पुढे म्हणाले,"तुनिषा शर्मा डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती पूर्णपणे खोटी आहे. जर ती डिप्रेशनमध्ये असती तर ती 12 तासाचं शूटिंग करू शकली नसती. तुनिषाने तिच्या करिअरवर लक्ष दिलं होतं".
संबंधित बातम्या