लडाखनंतर 'ट्युबलाईट' टीमचं मिशन मनाली!
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2016 03:23 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं काल हृदयविकारच्या तीव्र झटक्याने निधन झालं. अभिनेता सलमान खान स्टारर मच अवेटेड 'ट्युबलाईट' हा त्यांचा अखेरचा सिनेमा असून त्यामध्ये ते दिसणार आहेत.
नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'ट्युबलाईट' सिनेमा 2017 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. लडाखमध्ये या सिनेमाच्या शुटिंगचा पहिला टप्पा संपवून लवकरच दुसरा टप्पा मनाली या जमिनिपासून 13 हजार फूट उंचीवर शुट होणार आहे. लडाखमध्ये 15 दिवस शुटिंग केल्यानंतर पुढील शुटिंग जम्मूमध्ये होणार होती. मात्र जम्मूमधील राजकीय वातावरणामुळे ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे जम्मू प्रमाणेच वातावरण असणाऱ्या मनालीची निवड करण्यात आली असून स्थळ निवडण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. मनालीमध्ये शुटिंग याच महिन्यात होणं अपेक्षित होतं. मात्र स्थळ निवडण्याची प्रक्रिया बाकी आहे. तसंच सलमान बिग बॉसच्या शुटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या टप्प्यातील शुटिंग सुरु होणार आहे.