'बार बार..'मधून सविता भाभीचा संदर्भ काढा : सेन्सॉर बोर्ड
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2016 01:24 PM (IST)
मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'बार बार देखो' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने UA प्रमाणपत्र दिलं आहे. मात्र निर्मात्यांचा त्रास इतक्यात थांबलेला नाही. 'सविता भाभी'चा संदर्भ चित्रपटातून वगळण्याचं फर्मान सेन्सॉर बोर्डाने सोडलं आहे. ब्रा दाखवणारा एक सीनही बार बार देखो या चित्रपटातून काढण्यास सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना सांगितलं आहे. 'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार पॉर्नोग्राफिक कारटून कॅरेक्टर असलेल्या सविता भाभीचा संदर्भही सिनेमातून वगळण्यास सुचवलं आहे.