Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection Day 2:  ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhooti Main Makkaar) या चित्रपटामधील रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला कोट्यवधींची कमाई केली आहे. आता दुसऱ्या दिवशी देखील ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. 


रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhooti Main Makkaar) या चित्रपटानं बुधवारी (8 मार्च) भारतात 15.73 कोटींची कमाई केली. आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (9 मार्च) या चित्रपटाने 9 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची एकूण कमाई 24.73 कोटी झाली आहे. 


रणबीर आणि श्रद्धा यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती


वीकेंडला 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना रोमान्स, अॅक्शन, कॉमेडीचा तडका बघायला मिळणार आहे. या चित्रपटामधील रणबीर आणि श्रद्धा यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. चित्रपटामधील काही इमोशनल सीन्समधील रणबीरच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 


‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटात स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. बोनी कपूर यांनी या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन लव्ह रंजन यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. 


रणबीर आणि श्रद्धाच्या चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती 


'एक व्हिलन', 'हैदर', 'बागी', ​​'हाफ गर्लफ्रेंड', 'हसिना पारकर','बत्ती गुल मीटर चालू', 'स्त्री', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमधून श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या भेटीस आली. तर रणबीर हा रॉकस्टार, बर्फी आणि ये जवानी है दिवानी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. हे चित्रपट हिट ठरले. रिलीज झाल्यानंतर ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरेल का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला होता.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार'ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई