Satish Kaushik Passes Away: सतीश कौशिक यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सगळ्याच बॉलीवूड सेलिब्रिटींचे डोळे पाणावले असून कोणाचा विश्वास बसत नाही की सतीश कौशिक यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अनेक चित्रपटांमध्ये सतीश कौशिकचा सहकलाकार असलेल्या गोविंदाने अभिनेत्याच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाने खूप दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले.


Satish Kaushik Death:  माझे पप्पू पेजर नाही राहिले 


ई-टाइम्सशी संवाद साधताना गोविंदा म्हणाला, ''हे खूप दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. माझ्या साजन चले ससुरालमधील मुथू, दीवाना मस्ताना मधला पप्पू पेजर आणि बडे मियाँ छोटे मियाँ मधला शराफत अली आता राहिले नाहीत, हे खूप वाईट आहे.''


Satish Kaushik Death: सतीश कौशिक-गोविंदाची जोडी होती हिट 


सतीश कौशिक (Satish Kaushik) हे त्यांच्या अप्रतिम कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात . 'साजन चले ससुराल'मध्ये ते मुथूच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये त्यांनी शराफत अलीची भूमिका साकारली होती. दुसरीकडे सतीश कौशिक यांची 'दीवाना मस्ताना' मधील पप्पू पेजरची भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. गोविंदा आणि सतीश कौशिक यांची जोडी रुपेरी पडद्यावर खूप पसंत केली गेली आहे.


सतीश कौशिक यांच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सतीश यांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. प्राथमिक अहवालात त्यांच्या शरीरावर जखमेचे एकही चिन्ह आढळले नाही. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.


Satish Kaushik Death: या चित्रपटाचे केले होते दिग्दर्शन


विशेष म्हणजे अभिनेता असण्यासोबतच सतीश कौशिक हे एक उत्कृष्ट दिग्दर्शक देखील होते. दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट 'कागज' होता. ज्यामध्ये पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसले होते. सतीश कौशिक अलीकडेच  छत्रीवाली या चित्रपटात दिसले होते. तसेच सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट इमर्जन्सी आहे, ज्याचे दिग्दर्शन कंगना रणौतने केले होते. यामध्ये ते राजकारणी जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 


इतर बातमी : 


खोटं बोलतोय हे शोधणारी पॉलीग्राफ टेस्ट नेहमीच अचूक असते का? एखादा मुरब्बी आरोपी लाय डिटेक्टरी मशिनला फसवू शकतो का?