Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा रोमँटिक कॉमेडी कथानकावर आधारित  'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Mein Makkar) हा चित्रपट काल (8 मार्च) रिलीज झाला. या चित्रपटातील श्रद्धा आणि रणबीर यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...


तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार, 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटानं काल (9 मार्च) भारतात 15.73 कोटींची कमाई केली. ओपनिंग-डेच्या कमाईत 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटानं अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटाला आणि कार्तिक आर्यनच्या शेहजादा या चित्रपटाला मागे टाकले आहे.  


वीकेंडा 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना रोमान्स, अॅक्शन, कॉमेडीचा तडका बघायला मिळणार आहे. या चित्रपटामधील रणबीर आणि श्रद्धा यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. चित्रपटामधील काही इमोशनल सीन्समधील रणबीरच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 






‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटात स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीनं आणि डिंपल कपाडिया, बोनी कपूर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लव्ह रंजन यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.  


चित्रपट झाला होता लीक


रिलीज झाल्यानंतर ‘तू झूठी मैं मक्कार’  हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यानं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरेल का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला होता.  पण चित्रपटानं पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Tu Jhoothi Main Makkaar Leaked: श्रद्धा आणि रणबीरच्या चित्रपटाला मोठा फटका; रिलीज झाल्यानंतर काही तासातच 'तू झूठी मैं मक्कार' लीक