TJMM And Mrs Chatterjee vs Norway Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर बिग बजेट चित्रपट रिलीज होत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळत आहे. 2023 ची सुरुवात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटानं दणक्यात केली. त्यानंतर देखील काही चित्रपट रिलीज झाले. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या  ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhooti Main Makkaar) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटातील रणबीर आणि श्रद्धाच्या केमिस्ट्रीचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. तसेच राणी मुखर्जीचा (Rani Mukerji)  ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ (Mrs Chatterjee vs Norway) हा चित्रपट देखील रिलीज झाला आहे. या चित्रपटातील राणीच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले. ‘तू झूठी मैं मक्कार’ आणि  ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’  हे दोन्ही चित्रपट सध्या चर्चेत आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांचे कलेक्शन... 


‘तू झूठी मैं मक्कार’बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ 


रणबीर आणि श्रद्धा यांच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत. या चित्रपटाच्या कलेक्शननं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. रिलीजनंतर 15 व्या दिवशी म्हणजेच 22 मार्च रोजी (बुधवार)  ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटानं 3 कोटींचे कलेक्शन केले. 15 दिवसात या चित्रपटानं  117.29 कोटींची कमाई केली आहे. 


‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ठरतोय फ्लॉप


राणीचा  ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. हा चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले आहेत. बुधवारी (22 मार्च) या चित्रपटानं 1.45 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं सहा दिवसात 9.87 कमावले. सहा दिवसात हा चित्रपट 10 कोटींची कमाई देखील करु शकला नसल्यानं हा चित्रपट फ्लॉप ठरतोय, असं म्हटलं जात आहे. 


‘तू झूठी मैं मक्कार’ आणि ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ ची स्टार कास्ट 


'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तर  ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ या चित्रपटात राणी मुखर्जीसोबतच नीना गुप्ता आणि अनिर्बान भट्टाचार्य यांनी महत्वाची भूमिका सााकरली आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Bhola Shankar : चिरंजीवीच्या 'भोला शंकर'ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित